Cinemajha Exclusive : Enjoy this monsoon with super hit Marathi rain songs

पाऊस ही अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. तो सर्वांनाच हवाहवासा वाटतो. प्रत्येकाची पाऊस ‘एन्जॉय’ करण्याची पध्द्त वेगवेगळी असली तरी तो आला की सगळेच आनंदुन जातात. पाऊस आला कि कवी-कवयित्री, साहित्यिक, चित्रकार यांच्या विचारांची एक्स्प्रेस धावायला लागते. 
आपल्या भावना ते शब्दांमधे उतरवण्याचा प्रयत्न करतात; मग ती कविता असो, चित्र असो किंवा एखादा छोटासा लेख. आपल्या विचारांनी निसर्गाचे अनमोल सौन्दर्य त्यांच्याकडून शब्द, लेखणी, कुंचला यांच्याद्वारे कागदावर साकारले जाते. छायाचित्रकार ‘युनिक’ फोटो शोधत बसतात. ते पावसातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या कॅमेर्यात कैद करतात. भिजणारी लोक, पावसाचा आनंद लुटणारी लहान मुले, एकाच छ्त्रीत फिरणारी प्रेमी युगुले, पावसाच्या मार्याने पडलेली झाडे अशा विविध विषयातून लोकांसमोर पावसाळा मांडतात.
हिरवाईचं समृद्ध लेणं ल्यायलेली सृष्टी, आकाशातील इंदधनुष्यामुळे झालेले सप्तरंगी विचार, विविध फुलांनी सजलेली धरणीमाता अशा विविध उपमांच्या आधारे मानवी जीवन आणि निसर्ग यांचा सहसंबंध जोडला जातो. आशय या सुंदर पावसाळ्यात निसर्गची अनुभूती देणारी हि मराठी चित्रपटातील सुंदर गाणी .