Gudi Padwa Wishes & Celebration By Marathi Actresses

भारतात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा, संवत्सर प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपले पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतांत कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा इतर भारतीय प्रांतांत चेटी चांद, उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो.


गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. गुढीपाडव्या हा मंगलमय आणि चैतन्यमय सण आहे या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात नवीन कपडे घालतात .गुढीपाडव्याच्या निमित्ताने मराठी सिनेनाट्यसृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेत्रींचा ‘मराठमोळा’ अंदाजत तुम्हाला पाह्यला मिळणार आहे. यंदांच्या गुढीपाडव्याला तुम्ही पारंपारीक मराठमोळ्या पध्दतीने सजून-नटून आनंदाची गुढी उभारा.


गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या, तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना ‘मनःपूर्वक’ शुभेच्छा !!!


[envira-gallery id=”1727″]

Leave a Reply

Your email address will not be published.