Upcoming movie ‘Vitthala shappath’ music launched

Vitthala Shappat music launch 03

‘विठ्ठला शप्पथ’ या आगामी मराठी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या वेळी अनेक नामवंत मान्यवरांनी उपस्तीथी लावली होती. या वेळी चित्रपटातील कळकरांनी स्कीट सादर केले व चित्रपटाच्या म्युझिक टीमने संगीत निर्मिती करत असताना आलेली अनुभव प्रेक्षकांना सांगितले.या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत पवार यांनी केले असून गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 

Vitthala Shappat music launch 01

 

मंगेश कागणे व क्षितीज पटवर्धन या लोकप्रिय गीतकारांच्या शब्दांनी यातील चारही गीते सजली असून चिनार-महेश या युवा संगीतकार जोडीचा संगीतसाज या गीतांना लाभला आहे.या चित्रपटात एकूण ४ गाणी आहे. ‘ठाई ठाई माझी विठाई’ हे गायक राहुल देशपांडे यांच्या आवाजातील ‘ठाई ठाई माझी विठाई’ तसेच आदर्श शिंदे यांनी गायलेलं ‘देव कोंडला’ हे भक्तीगीत प्रेक्षकांना समाधानाची अनुभूती देतील . ‘बोले तुना तुना’ हे स्वप्नील बांदोडकर व आनंदी जोशी यांच्या आवाजातील प्रेमगीत व ‘झक्कास छोकरा’ हे प्रवीण कुँवर यांनी स्वरबद्ध केलेलं धमालगीत प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवणारी गाणी आहते. ‘विठ्ठला शप्पथ’ चित्रपटातील गाणी ‘व्हिडिओ पॅलेस’ या म्युझिक कंपनीने प्रकाशित केली आहेत.

 

Vitthala Shappat music launch 02

 

‘विठ्ठला शप्पथ’ चित्रपटातून विठू माऊलीचं त्यांच्या भक्तांशी असलेलं अतूट नातं पहायला मिळणार आहे. या चित्रपटात मंगेश देसाई, अनुराधा राजाध्यक्ष, उदय सबनीस, विद्याधर जोशी, संजय खापरे, अंशुमन विचारे, केतन पवार, विजय निकम, प्रणव रावराणे, राजेश भोसले या कलाकारांसह विजय साईराज आणि कृतिका गायकवाड हे कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

 

Vitthala Shappat music launch 04

 

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठू माऊलीचे दर्शन घडवणारा ‘विठ्ठला शप्पथ’ १५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.