Sonali Kulkarni wrote letters to thank the ‘Kaccha Limbu’ team

Sonali kulkarni Letters for kaccha Limbu

 

चित्रपटातील कलाकार जेव्हा पाड्यावर एखादी भूमिका साकारतात तेव्हा ते पात्र ते अक्षरशः जगतात. त्या पात्रांच्या सौवेदना व्यक्तिरेखा याच्याशी ते पूर्णपणे एकरूप झालेले असतात. त्यांच्या या प्रवासामध्ये ते एकटे नसून सहकलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, कलादिग्दर्शक, रंगभूषाकार अशा अनेक लोकांच्या एकत्र प्रवासाने तयार होते एक उत्तम कलाकृती. आसा काहीसा प्रसंग अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने त्यांच्या आयुष्यात अनुभवला आहे. सोनाली कुलकर्णी हि अतिशय संवेदनशील अभिनेत्री आहे . तिने ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटातील ‘शैलजा काटदरे’ हे व्यक्तिरेखा साकारताना तिच्या मनात आलेली व्याकूळता पत्र लिहून व्यक्त केली आहे.

 

तिने लिहिलेल्या या पत्रामध्ये ती म्हणते कि ‘शैलजा काटदरे’ या व्यक्तिरेखेने तिच्या खऱ्या आयुष्यातील आई, मैत्रीण, पत्नी या भूमिकांना एक नवीन आयाम मिळवून दिला. तसेच तिची या भूमिकेसाठी निवड केल्यामुळे दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच सोनाली ते शैलजा या प्रवासातील तिचे सहप्रवासी ज्यांच्यामुळे तो प्रवास खुलत गेला आणि तिच्यातली प्रसंगी कणखर तर प्रसंगी हळवी अशी शैलजा तिला सापडत गेली अशा सर्व सहकलाकारांना तिने पत्रं लिहिली आहेत. तिने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे तिने तिच्या सहकलारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

 

सोनाली कुलकर्णी ने प्रसाद ओक, रवी जाधव, सचिन खेडेकर, मनमीत पेम, चिन्मय मांडलेकर, संतोष फुटाणे, राहुल रानडे, विद्याधर बट्टे, अनिता अशा सर्वां कलाकारांना स्वहस्ताक्षरात लिहिलेली हि पत्रे सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Sonali Kulkarni Letters 08

Sonali Kulkarni Letters 07

Sonali Kulkarni Letters 06

Sonali Kulkarni Letters 05

Sonali Kulkarni Letters 04

Sonali Kulkarni Letters 03

Sonali Kulkarni Letters 02

Sonali Kulkarni Letters 01