Shreyas jadhav to become the first Marathi rapper…

बॉलीवूड मधील गाण्यांमध्ये आतापर्यंत अनेक प्रकचे ‘रॅप’ आपण ऐकले आहे . आजकाल हाच ट्रेंड इतर भाषांमध्ये देखील पाहायला मिळत आहे. लवकरच आपल्यासमोर मराठी रॅप गाणे येणार आहे . यापूर्वी मराठीच्या काही पॉप गाण्यांमध्ये रॅपचा वापर केला गेला आहे तरी, प्रथमच एक संपूर्ण गाणे ‘रॅप’मध्ये सादर होणार आहे. असे हे मराठमोळे ‘रॅपसॉंग’ श्रेयस जाधव याने गायले आहे .
निर्माता आणि गायक श्रेयस जाधव याने या आधी ‘ऑनलाईन बिनलाईन’ या सिनेमाची निर्मिती केली होती व या सिनेमामध्य असेल्या ‘ओ हो काय झालं’ या हरिहरन आणि लेसली लुईस यांच्या गाण्यामध्ये श्रेयसने स्वतः रॅपिंग केलं होतं . प्रेक्षकांना हे गाणं अतिशय आवडलं होतं.

Shreyas Jadhav
Shreyas Jadhav

संपूर्ण गाणं रॅप च्या स्वरूपात आसण हा ट्रेण्ड मराठी मराठी चित्रपटश्रुष्टीला तसा नविनच आहे . मराठी चित्रपटश्रुष्टी हि संगीताच्या बाबतीत कुठेही मागे नाही हे “सैराट ” या चित्रपटच्या गाण्याने संपूर्ण जगाला दाखवून दिले . इंग्रजी गाण्यांवर भुलणाऱ्या आजच्या तरुणाईला मराठी रॅप वर श्रेयस जाधव लवकरच थिरकवणार आहे.. लवकरच तुमच्या भेटिस येणारे हे गाणे वैभव जोशी यांनी लिहिले आहे तसेच हृषिकेश, सौरभ आणि जसराज यां गाण्याचे संगीत बनवले आहे. या गाण्यामध्ये पुणेरी वैशिष्ट्यांचा उल्लेख केला गेला असून आपल्याला प्रसिध्द शनिवारवाड्याचे भव्य दिव्य रूपही यात पाहायला मिळणार आहे.
मराठी संगीतक्षेत्राला एक महत्वाचे वळण देणारे हे गाणं एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनर खाली प्रसिद्ध होणार आहे .

हे गाणं संपूर्ण महाराष्ट्राच्या तरुणाईला वेड लावणारा ठरेल असा  श्रेयसचा ठाम विश्वास आहे. श्रेयसची निर्मिती ‘बघतोस काय मुजरा कर’ आणि ‘बसस्टॉप’ हे दोन सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत.याच बरोबर अजून काही रॅप गाणीदेखील या वर्षात काढ्यासाठी श्रेयस सज्ज आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.