Shivani Baokar’s upcoming movie ‘Undga’

Undga article 01

 

सध्या ‘लागिरं झालं जी’ या मालिकेची सर्वत्र चर्चा सुरु आहे . या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेमधून शीतलची भूमिका साकारणारी शिवानी बावकर या अभिनेत्रीने भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे. मालिकेतला शीतलचा अंदाज प्रेक्षकांना पसंत पडला असून ती सध्या महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध झाली आहे.’उंडगा’ या सिनेमातून ती रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमात तिचा लूकही मालिकेप्रमाणेच पाहायला मिळत आहे.सध्या सिनेमाच्या निमित्ताने शिवानीचा नववधू लूक व्हायरल झाला आहे.

 

Undga article 02

 

‘उंडगा’ या चित्रपटातही कोकणातील अनेक जुने-नवे चेहरे आपल्याला पहायला मिळणार आहेत. मैत्रीवर भाष्य करणार्‍या या चित्रपटात सध्या तरुणाईच्या मनावर राज्य करणारी शिवानी बावकर आणि स्वप्निल कनसे, चिन्मय संत हे प्रमुख भुमिकेत असुन एका महत्वाच्या भुमिकेत तळ्याचा सुपूत्र नृत्य दिग्दर्शक सागर खैरे हा नवा चेहरा आपल्या समोर येत आहे. एक गुणी नृत्य दिग्दर्शक म्हणून ओळख असणारा सागर अभिनेता म्हणून या चित्रपटातून पदार्पण करतो आहे.

 

Undga article 03

 

उंडगा या चित्रपटाचे चित्रीकरण निसर्गाने नटलेल्या तळा तालुक्यामध्ये मुख्यत्वे झाले आहे. त्याचबरोबर इंदापूर, माणगाव येथेही काही भागांचे चित्रीकरण झाले आहे. निर्माता सिकंदर सय्यद यांनी अनेक स्थानिक कलाकार आणि तंत्रज्ञान यांना या चित्रपटात मोठी संधी दिली आहे. तळ्याचा निलेश कार्लेकर या हरहुन्नरी कलाकाराने सहकार्यकारी निर्माता म्हणून या चित्रपटाचे चित्रीकरण यशस्वीरित्या पार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.अलिबागचे संगीतकार म्हणून प्रसिध्द असलेले विक्रांत वार्डे प्रथमच चित्रपट दिग्दर्शक उंडगा या बिग बजेट चित्रपटाची हाताळणी करताना दिसणार आहेत.

 

सायरा सय्यद आणि सिकंदर सय्यद निर्मित या चित्रपटात जेष्ठ कलाकार अरुण नलावडे, संग्राम समेळ, प्रतिमा वाले आणि शर्वरी गायकवाड हे ही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट दिग्दर्शनासोबत संगीत दिग्दर्शनही विक्रांत वार्डे यांचे आहे. सुर्यकांत घोरपडे यांनी आपल्या कॅमेर्‍यातून चित्रपटाला अधिक सुंदर बनवले आहे. ‘उंडगा’ हा चित्रपट ४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.