Have you seen Deva’s colorful motion poster

Deva 01

 

मराठी चित्रपटातील सुपरस्टार अंकुश चौधरी ची प्रमुख भूमिका असलेला ‘देवा’ हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीसाठी येत आहे. हा अतरंगी ‘देवा’ नेमका कसा असेल? याची उत्सुकता लोकांना लागली आहे. मुरली नलप्पा दिग्दर्शित हा सिनेमा रसिकांच्या जीवनात रंग भरण्यास सज्ज झाला आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर विविध रंगाने नटलेला मोशन पोस्टर लाँच करण्यात आला. या चित्रपटाची निर्मिती इनोव्हेटिव्ह फिल्म्स यांनी केली आहे.अंकुशने या चित्रपटात साकारलेल्या ‘देवा’ या पात्राचे व्यक्तिमत्व रंगबेरंगी असून प्रत्येकाच्या आयुष्यात रंग भरण्याचे काम तो या सिनेमातून करणार आहे.रात्री १२ वाजता या चित्रपटाचे हा पहिला मोशन पोस्टर सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आला. अशाप्रकारे मध्यरात्री सिनेमाचा टीझर मोशन पोस्टर लाँच करण्याची ही पहिलीच वेळ असून ‘देवा’ सिनेमाच्या पूर्वप्रसिद्धीकरिता यासारख्या अनेक नवीन कल्पना चित्रपटाच्या टीम ने निश्चित केल्या आहेत.

 

‘देवा’ च्या या आगळ्या वेगळ्या प्रसिद्धीमुळे सगळीकडे कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘देवा’ या चित्रपटातील अंकुशचा लूक काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांसमोर आण्यात आला होता. या नंतर अंकुशच्या या लुकची सगळीकडे चर्चा होती. आपल्या नेहेमीच्या भूमेके पेक्षा हटके लुक मध्ये अंकुश पाहायला मिळत आहे. रंगीत सदरा, फॅन्सी लॉकेट, हातात माळ, इयर रिंग्स आणि केसांची मॉडर्न स्टाईल असा या चित्रपटातील अंकुशचा लूक दिसत आहे. या लूकप्रमाणेच या चित्रपटातील त्याची भूमिकादेखील काहीशी हटके असणार आहे. या चित्रपटात तो प्रत्येकाला मदत करण्यास तत्पर असणाऱ्या एका व्यक्तिची भूमिका साकारणार आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव देवा असून तो सगळ्यांचा लाडका दाखवला जाणार आहे.

 

अंकुशने मराठी चित्रपटासृष्टीला दुनियादारी, डबल सीट, दगडी चाळ असे एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. ती सध्या काय करते या त्याच्या या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला.’देवा’ हा चित्रपट येत्या १ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.