Sagar Sakarnaar plays important role of Morpant in Ritesh Deshmukh’s – Chatrapati Shivaji

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जीवनावर आधारित ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटाची निर्मिती अभिनेता रितेश देशमुखने सुरू केली आहे.

स्वत: रितेश यामध्ये महाराजांची मुख्य भूमिका साकारतोय. या ऐतिहासिक चित्रपटात अनेक महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. त्यातीलच एक अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे मोरोपंत पिंगळे यांची. या भूमिकेसाठी प्रतिभावान अभिनेता सागर तळाशीकर याची निवड झाली असून, मोरोपंतांचा फर्स्ट लुक सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध झाला आहे. मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे शिवाजीराजांच्या मंत्रिमंडळातील सर्वोच्च मंत्री होते.

स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर त्यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे, यावरून या पदाचे महत्त्व लक्षात येते. मोरोपंतांच्या या भूमिकेसाठी सागरची निवड झाल्यामुळे त्याच्या चाहत्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ritesh Deshmukh in Chatrapati Shivaji
Ritesh Deshmukh in Chatrapati Shivaji

मोरोपंत पिंगळेंचा हा फर्स्ट लुक सागर तळाशीकरने आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे. हा लुक मेकअपमन सुहास गवते यांनी कुशलतेने बनवला आहे. शिवाजीमहाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटात हिंदी-मराठीतील अनेक नामवंत कलाकार काम करणार असल्याचे समजते. ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कारविजेते दिग्दर्शक रवी जाधव करीत आहेत. रवीने पहिल्यांदाच बँजो या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता तो या ऐतिहासिक चित्रपटाला कशा प्रकारे दिग्दर्शित करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

या चित्रपटात अनेक हिंदी कलाकार असल्याचे बोलले जातेय. एवढेच नाही, तर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानदेखील यामध्ये झळकणार असल्याचे समजतेय. आता खरे काय ते आपल्याला लवकरच समजेल.

Leave a Reply

Your email address will not be published.