Sachin Khedekar to play a different role in ‘Baapjanma’ watch trailer now

Sachin Khedekar lead role Baapjanma 01

 

बापजन्म’ या निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.अभिनेता सचिन खेडेकर याना आपण एका वेगळ्या भूमिकेत पाहणार आहोत. ‘बापजन्म’ हा चित्रपट बाप आणि मुले यांच्यातील निर्माण झालेला दुरावा यावर आधारित आहे. ज्या व्यक्तीला सौवेदना नाही तिला संवेदनांबद्दल समजावणे फार कठीण असते. बाप होणे म्हणजे संसार, मुले, त्यांचे शिक्षण या सगळ्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर वाहणे. या प्रवासात कधी कधी वडील रुक्ष आणि कठोर होतात. बाप म्हणून आपली कर्तव्ये पार पाडत असताना नकळतपणे नाती दुखावली जातात. पुढे जाऊन आयुष्यात कधी तरी या गोष्टी समोर येतात व झालेल्या चुका जाणवू लागतात. कधी कधी तर तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

 

सचिन खेडेकर यांचे या चित्रपटातील पात्र भास्कर पंडीत त्यांच्याकडूनही नकळत काही चुका होतात व या चुका सुधारण्याचा निश्चय ते करतात. या चुका सुधारण्याकरिता ते आपल्या मित्रांसोबत एका मिशनला सुरूवात करतात. हाच एका वडिलांनी आयुष्यात केलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न बापजन्म या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. सचिन खेडेकर यांची या चित्रपटात मुख्य भूमिका असून त्याच्यासोबत पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि आकाश खुराणा हे कलाकार देखील या चित्रपटात झळकणार आहेत. ‘बापजन्म’ या चित्रपटाचे लेखन निपुण धर्माधिकारी यांने केले आहे. ‘बापजन्म’ येत्या २९ सप्टेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.