Rinku Rajguru soon to be seen in her next Marathi Film

Rinku New movie 02

 

सैराट चित्रपट म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर येतात आर्ची आणि परश्या. या चित्रपटातील आर्चीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने अवघ्या भारताला वेड लावलं. तिचं वागणं, बोलणं, स्क्रीनवरील वावर, डोळ्यांमधील चमक यामुळे तिने साकारलेली आर्ची रसिकांच्या मनामनात भिनली. सर्व प्रेक्षक जणू काही आर्चीच्या झिंगाट प्रेमात पडले. तिच्या या उत्तम अभिनयामुळे तिला मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु हि महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात प्रसिद्ध असलेलं नाव. विशेष म्हणजे फक्त मराठीच नाही तर इतर भाषांमध्येही तिच्या अभिनयाची जादू आपण पहिली.

 

Rinku new movie 01

 

सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड मोडले व परदेशात देखील भरपूर प्रसिद्धी मिळवली. आर्चीचा आगामी चित्रपट कोणता असेल याची रसिकांना उत्सुकता होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिंकु राजगुरू लवकरच एका मराठी सिनेमात झळकणार आहे. सध्या सिनेमाचे वाचन सुरू असून या सिनेमाची इतर माहिती गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे .लवकरच सिनेमाची घोषणा करण्यात येणार आहे. सैराट सिनेमात आर्ची आणि परशा यांची रोमँटीक लव्हस्टोरी सगळ्यांना खूप आवडली होती. या नंतर आता रिंकुच्या आगमी मराठी सिनेमात तिच्यासह कोण झळकणार याविषयी सगळीकडे सध्या चर्चा सुरु आहे.

 

नागराज मंजुळेच्या दिग्दर्शित ‘सैराट’ ला फक्तर महाराष्ट्रानं नाही तर संपूर्ण देशाने डोक्यावर घेतलं. या चित्रपटाच्या यासाह्यानंतर नागराज मंजुळेसुध्दा ‘द सायलेन्स’ या चित्रपटुन अभिनय करताना दिसणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक करण जोहर आता हिंदीमध्ये ‘सैराट’ घेऊन येत असून, यामध्ये आर्चीच्या भूमिकेत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बघावयास मिळणार आहे.