Is Mrunmayee Deshpande married to Suvrat Joshi?

Shikari new movie 01

काही दिवसं पूर्वी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हीच लग्न स्वप्निल राव सोबत झाला होतं तर आता पुन्हा तिच्या आणि अभिनेता सुव्रत जोशीसोबत लग्न केल्याचा फोटो सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. तर त्यांच्या या वायरल झालेल्या फोटो मागचे कारण आहे त्यांचा आगामी चित्रपट शिकारी. शिकारी हा चित्रपट लवकरच येत असून या चित्रपटासाठी सुव्रत आणि मृण्मयी यांनी नुकतेच लग्नाच्या दृश्याचे चित्रीकरण केले.

 

सुव्रतने हा फोटो सोशल मीडिया वर पोस्ट केला असून त्यासोबत एक छानशी पोस्ट लिहिली आहे. त्याने या फोटो सॊबत असेही लिहिले आहे कि,” मी लहान असताना चित्रपटात कोणाचे लग्न झाल्यास त्यांचे खऱ्या आयुष्यातही लग्न होते का हा प्रश्न मला पडायचा तर मोठा झाल्यानंतर लोक येवढ्या धुमधडाक्यात लग्न का करतात हा प्रश्न मला पडायचा. यातील काही प्रश्नांचे उत्तर मला नुकतेच मिळाले. या वेड्या व्यक्तिसोबत चित्रीकरण करायला खूपच मजा आली. ” सुव्रत जोशी ला आपण दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून पहिले. त्याच्या उत्तम अभिनयामुळे त्याने त्याचा एक स्वतंत्र प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे.

 

Shikari new movie 03

 

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने अनेक चित्रपटातून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या नटसम्राट या चित्रपटामध्ये तिने साकारलेल्या भूमिकेच खूप कौतुक झालं होतं . तिचे लग्न स्वप्निल राव सोबत झाले असून या प्रसंगी मराठी इंडस्ट्रीतील अनेक सिताऱ्यांनी धमाल केली होती. मेहंदी, संगीत, हळद आणि रिसेप्शन अशा अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहून सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, शंकर महादेवन, पुष्कर श्रोत्री, भार्गवी चिरमुले, भुषण प्रधान अशा सेलिब्रेटीजनी मृण्मयीच्या लग्नाला चारचाँद लावले होते. मृण्मयीचे लग्न धुमधडाक्यात झाले होते.

 

Shikari new movie 02

शिकारी या आगामी चित्रपटात मृण्मयी आणि सुव्रत हे नवीन जोडी काय जादू दाखवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published.