Marathi Industry encourages, people to cast their vote for BMC Polls

आज सकाळ पासून सगळीकडे मतदान करण्याची गडबड सुरु आहे .मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे . तसेच आपले मतदान करणे हे प्रत्येकाचे  कर्तव्यदेखील आहे. यंदाच्या वर्षी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम केले आहेत.टीव्ही, चित्रपट, सोशलमीडिया, पोस्टर, जाहिरात अशा विविध माध्यमातून नागरिकांना मतदान करा असे आवाहन केलं आहे .या विविध उपक्रमांमध्ये मराठी कलाकारदेखील मोठया उत्साहाने सहभागी झाले आहेत. आर्ची व परश्या यांच्या लोकप्रिय जोडीने लोकांना मतदानासाठी आवाहन केले आहे .
या सगळ्याचा परीणाम स्वरूप म्हणजे आज सकाळपासूनच मोठया प्रमाणात मतदानासाठी येणारे नागरिक. मतदान विषे विषयी जनजागृतीदेखील मोठया प्रमाणात झाली आहे , तरुण पिढी ने फेसबुक, ट्वििटर, इन्स्टाग्राम अशा अनेक सोशल नेटवर्किंग साईट वर मतदान करून झाल्यानंतर सेल्फी मोठ्या प्रमाणात पोस्ट केल्या आहेत.

Cast your vote!

[envira-gallery id=”1354″]

आज होत असणाऱ्या मतदानात मराठी  कलाकारांनी देखील मोठया प्रमाणात मतदान केले आहे . विशेष म्हणजे कामानिमित्त वेगळ्या शहरात राहणाऱ्या कलाकरानी आपल्या शहरात वेळेवर जाऊन मतदान केले आहे . या कलाकारांनी सोशलमीडियावर त्यांचे फोटो टाकले आहेत . मतदान केल्यानंतर त्यांनी आपला फोटो अपलोड केला असून लोकांना मतदान करा असे आवाहन केले आहे . सोनाली कुलकर्णी, महेश कोठारे , अधिनाथ कोठारे , उर्मिला कोठारे ,प्रिया बापट , उमेश कामात , तेजस्विनी पंडित , फुलवा खामकर , स्वप्नील जोशी , लीना जोशी ,सुयश टिळक, रेणुका शहाणे, श्रुती मराठे, पुष्कर श्रोत्री, सुनिल बर्वे, अभिजीत केळकर, आर्या आंबेकर, भारत गणेशपुरे, सायली संजीव, प्रशांत दामले, हर्षदा खानविलकर,ऋतुजा बागवे, शुभांगी गोखले , स्वाती चिटणीस  अशा अनेक कलाकारांनी जबाबदारीने मतदान करून नागरिकांसमोर  एक आदर्श ठेवला आहे .
रेणुका शहाणे याने केले मतदानासाठी आवाहन !!!

Leave a Reply

Your email address will not be published.