Marathi Actors playing lead roles in Mayanagari-City of Dreams.

मराठी चित्रपट तसेच मराठी कलाकार अलीकडे सगळीकडे चर्चेत आहते. वेबसिरीजसध्या प्रेक्षकांमध्ये खूप पॉप्युलर होताना दिसत आहेत. आपण नेटफ्लिक्स , हॉटस्टार , अमेझॉन प्राईम अशी विविध नवे नक्की ऐकली असणार. या माध्यमातून ते आपली स्वतंत्र मालिका काही भागांमध्ये दाखवतात. व काही वेळा या मालिकांचे अनेक सिझन सुद्धा असतात . तर सध्या अशी एक वेबसिरीज मराठी कलाकारांमुळे खूप गाजते आहे. हॉटस्टार वारी प्रदर्शित झालेली ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ असे या मालिकेचे नाव आहे. या आधी  एक आगळीवेगळी मालिका म्हणून क्रिमिनल जस्टिसला अभूतपूर्व यश मिळाला होतं . या नंतर हॉटस्टारने ‘सिटी ऑफ ड्रीम्स : एक राजकीय थरारनाट्य’ या नागेश कुकुनूर दिग्दर्शित मालिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळताना दिसत आहे. निर्मिती साहाय्य अप्लॉज एंटरटेन्मेंटचे असून कुकुनूर मूव्‍हीजने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे.

 

City Of Dreams 01

 

राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागेश कुकुनूर याने दिग्दर्शित केलेल्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या १०-भागांच्या वेबसीरिजमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते अतुल कुलकर्णी आणि सचिन पिळगावकर यांच्यासह टीव्ही व चित्रपट अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता इजाज खान तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नागेश कुकुनूर आणि रोहित बाणवलीकर यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. उदय टिकेकर, पावलीन गुजराल, गीतिका त्यागी, शिशिर शर्मा, संदीप कुलकर्णी, विश्वास किणी, अम्रिता बागची आणि फ्लोरा सैनी हे कलाकारही या मालिकेत आपल्याला दिसणार आहेत. .

 

 

City Of Dreams 02

 

भारतीय राजकारण आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडणारी कथा मुंबईतल्या पूर्णिमा आणि आशीष गायकवाड या भावा-बहिणीची व सत्ता काबीज करण्याच्या त्यांच्या लालसेची आहे. त्यांच्या वडिलांचा राजकीय वारसा चालविण्याची संधी मिळविण्याचा लढा जिंकण्यासाठी हे दोघे भाऊ-बहीण कोणत्याही थराला जाण्याच्या तयारीने प्रयत्न करतात. या चढा ओढी मध्ये  नक्की काय घडते हे तुम्हाला हि मालिका पाहिल्यावर नक्की समजेल.