Manish Paul Bollywood Celeb in Marathi Movie Hrudyantar

विक्रम फडणीसच्या सिनेमातून मनिष पॉल करणार मराठीत पदार्पण!!

मनिष पॉलने छोट्या पडद्यावरून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ‘राधा की बेटीया कुछ कर दिखायेगी’ या मालिकेत तो झळकला होता. त्यानंतर ‘डान्स इंडिया डान्स’, ‘झलक दिखला जा’ यांसारख्या कार्यक्रमात त्याने केलेले सूत्रसंचालन प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. छोट्या पडद्यावर त्याच्या कामाचे कौतुक झाल्यानंतर त्याला मोठ्या पडद्यावरच्या अनेक ऑफर्स मिळायला लागल्या.

तीस मार खान, एनी बडी कॅन डान्स यांसारख्या सिनेमांमध्ये त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर तो ‘मिकी व्हायरस’, ‘तेरे बिन लादेन २’ या सिनेमात त्याची मुख्य भूमिका होती. आता तो मराठी चित्रपटामध्ये काम करणार आहे.

विक्रम फडणीस यांच्या ‘हृदयांतर’ या सिनेमाचा मुहर्त सोहळा नुकताच पार पडला होता. या सिनेमात मनिष एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात तो मनिष पॉल हीच व्यक्तिरेखा साकारणार आहे.

Manish-Paul-in-Marathi-Movie-Hrudyantar
Manish-Paul-in-Marathi-Movie-Hrudyantar

मनिष आणि विक्रम अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. मनिषने आपल्या या मित्राच्या सिनेमाचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण केले. या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी मनिष सांगतो, “मला विक्रमने हृद्यांतरची कथा ऐकवल्यानंतर मला ती खूप आवडली होती. या सिनेमात तुला पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकायला आवडेल का असे मला विक्रमने विचारले आणि मी लगेचच या चित्रपटासाठी होकार दिला. विक्रमच्या सिनेमाचा मी हिस्सा बनलो याचा मला खूप आनंद झाला आहे. माझे या सिनेमातील दृश्ये ही लहान मुलांसोबतची आहेत. एका शाळेच्या क्रिडा महोत्सवात मी एक सेलिब्रिटी म्हणून येतो असे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लहान मुलांसोबत काम करताना मला खूपच मजा आली.”

Leave a Reply

Your email address will not be published.