Mahurat clap of ‘YeRe YeRe Paisa’ by MNS chief Raj Thackeray

Ye Re Ye Re Paisa Mahurat 02

संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा’ हा नवा कोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्याच प्रमाणे या चित्रपटातील कलाकारांची माहिती देखील प्रसिद्ध केली गेली आहे. काही दिवसांपूर्वी ये रे ये रे पैसा या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे या चित्रपटात नक्की कोण कोण कलाकार असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती.

 

Ye Re Ye Re Paisa Mahurat 01

 

या चित्रपटाचे टीझर पोस्टर गेल्या महिन्यात लाँच करण्यात आले होते.त्यावेळी चित्रपटातील कलाकारांची माहिती संजय जाधव यांनी गुप्त ठेवली होती. नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात संजय जाधव यांनी त्यांच्या चित्रपटात असणाऱ्या कलाकारांची नावे सांगितली. सिद्धार्थ जाधव, उमेश कामत , तेजस्विनी पंडितची या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे नवे पोस्टर हे एखाद्या नोटेप्रमाणे असून या नोटेवर सिद्धार्थ जाधव, उमेश कामत व तेजस्विनी पंडितची यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत.

 

गेल्या वर्षी संजय जाधव यांचा गुरू हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि आता तब्बल दीड वर्षांनंतर ये रे ये रे पैसा या चित्रपटाची माहिती मिळाली लवकरच हा चित्रपट येणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये भरपूर उत्सुकता पाहायला मिळत आहेत. संजय जाधव हे उत्तम दिग्दर्शक असल्यामुळे हा चित्रपट चांगलाच असणार या बद्दल अनेकांना खात्री वाटत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार ये रे ये रे पैसा हा चित्रपट जानेवारी महिन्यातच प्रदर्शित करण्याचे संजय जाधव यांनी ठरवले आहे. त्याने पुढे दिलेल्या माहितीनुदार हा चित्रपट ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.