Mahesh Manjrekar Presents ‘Shikari’

Shikari 02

 

काही दिवसांपूर्वी ‘शिकारी” या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडिया वर लाँच करण्यात आले. त्या दिवसापासून या चित्रपटविषयी खूप चर्चा सुरु होती. या पोस्टर वर असलेली तो अभिनेत्री नक्की कोण याचा सर्वजण विचार करीत होते. ‘शिकारी’ या सिनेमा आधीही बोल्ड पोस्टरमुळेच अनेक मराठी सिनेमांची चर्चा झाली.’शटर’,’एडल्ट ओन्ली”चित्रफित’ आणि ‘न्युड’ नुकताच प्रदर्शित झालेला ‘गुलाबजाम’ या चित्रपटाचे  पोस्टरसुद्धा बोल्ड आणि हॉट होते.

 

Shikari 03

 

शिकारी या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या चित्रपटाची अभिनेत्री प्रेक्षकांसमोर आली आहे .पोस्टरमध्ये झळकलेली सुंदर, बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री ही नेहा असून शिकारी हा तिचा पहिला मराठी चित्रपट आहे. नेहाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिच्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांना खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे.

 

 

शिकारी या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने यांनी केला असून या चित्रपटाची निर्मिती विजय पाटील यांनी केली आहे . या चित्रपटाचे प्रस्तुत करत आहेत दिग्दर्शक महेश मांजरेकर. या चित्रपटातील नेहाची अदा अगदी प्रेक्षकांना घायाळ करून टाकणारी आहे. हा एक बोल्ड चित्रपट असल्याने मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरच्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा चित्रपट ठरणार आहे. चित्रपटाचे शीर्षक , बोल्ड पोस्टर, आणि आता हा टिझर यामुळे या चित्रपटविषयी सगळीकडे चर्चा होत आहे. चित्रपटाच्या पोस्टर ने सिनेरसिकांना आकर्षित करण्यात येत हि परंपरा जुन्या जमान्यापासून ते आजतागायत चालत आली आहे. शिकारी हा चित्रपट 20 एप्रिलला रसिकांच्या भेटीला येणार आहे.संतोष जुवेकर,कुशल बद्रीके, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव हे मराठी अभिनेते झळकणार आहेत.