Maharashtracha Favourite Kon 2016

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा काल ,रविवार १९ मार्चला झी टॅाकीज वाहिनीवर दाखवण्यात आला.प्रेक्षकांनी दिलेल्या मतानुसार हा पुरस्कार देण्यात येतो .मराठी चित्रपटश्रुष्टी मधील प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपट तसेच कलाकार यांनी केलेल्या मेहेनतीला हा पुरस्कार देऊन सम्मानित केले जाते . आपल्या कलाकृतीला व वर्षभर केलेल्या मेहनतीला कौतुकाची थाप मिळावी, असं सगळ्याचं कलाकारांना वाटतं. महाराष्ट्राचा फेवरेट कोण? या पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षक पसंतीची मोहोर ‘सैराट’ चित्रपटावर उमटली असून, सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री पुरस्काराचे मानकरी आकाश ठोसर व रिंकू राजगुरू ठरले.

Maharashtracha Favoirute kon (2016-17 )02
रसिकांनी नोंदवलेल्या सर्वाधिक मतांनुसार, नागराज मंजुळे यांना सैराट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार मिळाला. त्याचा बरोबर ‘सैराट’मधील ‘झिंगाट’ व ‘आताच बया का बावरलं’ या गाण्यांसाठी अजय – अतुल व श्रेया घोषाल यांना पुरस्कार प्राप्त झाला. आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या दोघांनी नवोदित अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्काराचे मानकरी ठरले. महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन हा विशेष पुरस्कार आकाश ठोसरला देण्यात आला. त्याचप्रमाणे रिंकू राजगुरूने ‘फेवरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ हा पुरस्कार पटकाविला . सैराट चित्रपटामधील छाया कदम यांना सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार व तानाजी गालगुंडे यांना सहाय्यक अभिनेता या पुरस्कारासाठी मानकरी ठरले.सर्वोत्कृष्ट खलनायकाच्या भूमिकेसाठी अभिनेता सचिन पिळगांवकर यांना ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला . सर्वोत्कृष्ट गीताचा बहुमान ‘झिंगाट’ या सैराट चित्रपटातील गाण्याने ने पटकावला.

Maharashtracha Favoirute kon (2016-17 )03
या पुरस्कार सोहळ्याचे सूत्र संचालन श्रेयस तळपदे, अमेय वाघ याने केले. ‘गणेशवंदना’ सुखदा खांडकेकरने सादर केली . अतुल तोडणकर, अभिजीत चव्हाण, प्रियदर्शन जाधव, पुष्कर श्रोत्री, प्राजक्ता हनमघर, मेघना एरंडे, यांनी ‘शोकसभा’ हा विनोदी प्रयोग सादर केला. या पुरस्कार सोहळ्या दरम्यान अनेक विशेष नृत्य सादर करण्यात आले. सई ताम्हणकर, रिंकू राजगुरू, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, मृणाल ठाकूर यांचे बहारदार नृत्य, आकाश ठोसर व वैभव तत्ववादी यांचा रॉकिंग डान्स परफॉर्मन्स सादर करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या तारका साई ताम्हणकर यांच्या विषयी काही भन्नाट किस्से महेश मांजरेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.