Exclusive chat show Manjha Bole by Planet Marathi

Planet Marathi 02

मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्या चित्रपटांचे कौतुक सध्या संपूर्ण जगात होताना आपण पाहत आहोत. मराठी चित्रपटांनी सर्वांगीण प्रागिति केली आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो. वैविध्य पूर्ण कथेवर आज मराठी चित्रपट आधारित आहेत तसेच तांत्रिक बाबतीत चांगेलच परिवर्तन दिसत आहे. या गोष्टींमुळे मराठी सिनेमा आज अगदी साता समुद्रपार पोहोचला आहे. डिजिटल मिडीयावर मराठी चित्रपटाना व्यासपीठ मिळावं या उद्देशाने प्लॅनेट मराठी हि नवीन संकल्पना सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या संकल्पनेला ट्विटर इंडियाने पाठिंबा दिला आहे.

Planet Marathi 03

‘मांजा बोले’ हा कार्यक्रम प्लॅनेट मराठीने डिजीटल मिडीयाच्या माध्यमातून सुरु केला आहे. या कार्यक्रमाद्वारे मराठी सिनेमा तसेच सिनेमाशी निगडीत कलाकार, तंत्रज्ञ लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या चॅट शोची घोषणा मुंबईतील ट्वीटर आँफिसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली होती. ‘मांजा बोले’ या चॅट शोचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत. विशेष म्हणजे आपण प्रथमच त्यांना सूत्रधाराच्या भूमिकेत पाहणार आहोत.

Planet Marathi 04

या शो चा मूळ उद्देश सोशल मीडियावरून मराठी सिनेमा, कलाकार, लेखक आणि त्यांच्या कलाकृतींविषयी सविस्तर माहिती प्रेक्षकांसमोर यावी. महेश वामन मांजरेकर आपल्या खास शैलीतून शोमध्ये येणाऱ्या कलाकारांना बोलते करणार आहेत.ट्विटर इंडियाचे हेड विरल जानी या प्रसंगी संपूर्ण टीम ला यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Planet Marathi 05

या पत्रकार परिषदेच्या वेळी ‘मांजा बोले’ या कार्यक्रमाची झलक सादर करण्यात आली ज्यामध्ये विक्रम फडणीस तसेच अभिनेत्री सोनाली खरे यांच्याशी महेश मांजरेकर यांनी गप्पा मारल्या.या दोघांनी महेश मांजरेकर यांच्या तिरकस प्रश्नांना उत्तम उत्तरं दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.