DurgaPatil new comer Actress playing lead role in Upcoming Marathi movie Rajan !

मराठीच्या पडद्यावर ‘राजन’ हा चित्रपट गरजणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडेच सुरु आहे. ‘छोटा राजन’च्या जीवनावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटात संतोष जुवेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे, हे सर्वानांच ठाऊक आहे.

मात्र ‘राजन’ चित्रपटाची नायिका कोण या चर्चेला उधाण आले होते, बऱ्याच दिवासांपासून रंगत असलेल्या या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे, ह्याचे कारण म्हणजे दुर्गा पाटील हा नवीन चेहरा आपल्याला संतोष जुवेकरसोबत चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Durga patil 02

अवघ्या १९ वर्षाची ही अभिनेत्री राजन चित्रपटातील ‘राणी’ ह्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. विशेष म्हणजे, या भूमिकेसाठी दुर्गाची २३० मुलींमधून निवड करण्यात आली आहे.दुर्गा सध्या एसवायमध्ये शिकत असून ती रग्बी या खेळात राष्ट्रीय खेळाडू आहे. तसेच तिने मार्शल आर्टसमध्ये सुवर्ण पदकही पटकावले आहे.

पण ह्या भूमिकेसाठी तिला तिच्या देहबोली आणि भाषाशैली वर नक्कीच खूप मेहनत घ्यावी लागली. चित्रपटातील राणी या भूमिकेसाठी दिग्दर्शक भरत सुनंदा यांना कठोर,प्रेमळ आणि नाजूक अशी मुलगी हवी होती. मात्र दुर्गा एक खेळाडू असल्यामुळे या भूमिकेच्या सरावासाठी तिला ६ महिन्यांचा कालावधी लागला.थरारक गॅंगवॉर असलेल्या या कथेतून हळुवारपणे फुलत जाणारी प्रेमकथा ही दिसण्याची शक्यता आहे.

या चित्रपटाचे निमार्ते दर्शना भडांगे असून सह-निमार्ते दीप्ती श्रीपत आहेत.दिग्दर्शक भरत सुनंदा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रिधम मुव्ही प्रेजेंटसोबत मुदिता फिल्म्स प्रस्तुत राजन हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.