Cinemajha Hoil Special

Cinemajha wishes everyone a very Happy Holi!!!

होळी हा संपूर्ण भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला “होळी पौर्णिमा” असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून पंचमीपयर्त या ५-६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचदिवस हा उत्सव साजरा केला जातो. भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिग्मो किंवा शिग्मा म्हणतात.

  होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.‘रंगपंचमी’ हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात. नाना विविध रंगाची उधळण करायची आणि एका आगळ्या वेगळ्याच स्वानंदाच्या रंगांत रंगून जायचे हे साधायचं असत ह्या सणाच्या साजरेपणात. रंग.. खरंच प्रत्येक रंगाला एक अर्थ असतो. प्रत्येक रंगाची एक शिकवण असते. पांढरा रंग शांततेचा, लाल रंग त्यागाचा, हिरवा रंग समृद्धीचा. रंगांच्यामुळेच आपले जीवन हे सुद्धा रंगीन होते.

आकाशाचा निळा रंग, शेत शिवाराचा हिरवा रंग, खळखळणाऱ्या पाण्याचा पांढरा रंग, फांदीवर फुलणाऱ्या रंगीबेरंगी फुलाचे रंग, फुलाभोवती गुंजन करणाऱ्या भुंग्यांचे रंग, बागेत बागडणाऱ्या चिमुकल्या फुलपाखरांचे रंग, आपल्या अवती भवती ही रंगाची ‘रंगपंचमी’ नेहमीच फुलत असते व आपले मन मोहित असते.

होळी च्या आगमन निमित्त मराठी चित्रपटामधील होळी वर आधारित काही धम्माल गाणी ..

 

Leave a Reply

Your email address will not be published.