Box Office : Weekend collections for “Ti Sadhya Kay Karte”

नववर्षाची दमदार सुरूवात झी स्टुडिओच्या ‘ती सध्या काय करते’ने केली आहे. सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार अवघ्या तीन दिवसात या चित्रपटाने तब्बल ५ कोटी ५० लाख रुपयांची भरघोस कमाई केली आहे.

TSKK All characters Selfie

खरंतर ‘ती सध्या काय करते’ या सिनेमाच्या कथेचा जीव अगदी छोटा आहे, पण तो माझ्या-तुमच्या-सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि सतीशने तेवढ्याच जिव्हाळ्याने बनवला असल्यामुळे, सिनेमा पाहताना आपला जीव अडकतो. फक्त सिनेमा संपल्यावर एक प्रश्न नक्की पडतो- ‘ती सध्या काय करते’ कळलं, किंवा ‘तो सध्या काय करतो’ कधी कळणार?
महाराष्ट्रासह गोवा, गुजरात कर्नाटक, मध्य प्रदेश दिल्ली, आंध्र प्रदेश हैदराबादमध्ये हा चित्रपट अनेक ठिकाणी ‘ती सध्या काय करते’ हाऊसफुल्ल जात असून कमाईचे चांगले आकडे या ठिकाणाहून येत आहे.

मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीमुळे अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट प्रदर्शित केले गेले नाही . पण नवीन वर्षातील हिंदीत दंगल आणि आता मराठीत ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाने दाखवून दिले की नोटबंदीचा चांगल्या चित्रपटांवर कोणताही परिणाम होत नाही.

२०१६मधील नटसम्राट या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीचा दर्जा उंचावला होता व सैराटने सर्व रेकॉर्ड ब्रेक करत मराठी चित्रपटांना थेट बॉलीवूड चित्रपटांसखी प्रसिद्धी प्रदान केली . नुकत्याच प्रदर्शित झ्हालेल्या ‘ती सध्या काय करते’ ने २०१७ चा तीन दिवसात पाया रचला असून हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगले जाईल याचे संकेत दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.