Bollywood actress Sarika will work in this upcoming Movie
साध्य मराठीत नवनवीन विषयी , प्रगत तंत्रग्यान यांचा वापर होताना दिसत आहे. विशेष म्हणजे अनेक मराठी फिल्म्सने बॉलिवूडपेक्षाही जास्त कमाई करून दाखवली आहे. मराठी चित्रपटसृष्टीची एकूण वाटचाल पाहता सध्या खूप चांगले दिवस आले आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यामुळे अनेक बॉलिवूडमधील कलाकार मराठी चित्रपटांकडे धाव घेत आहेत. काही तर मराठी चित्रपट निर्मिती देखील करीत आहेत. प्रियांका चोप्रा, अजय देवगण, गणेश आचार्य यासारख्या सेलेब्रिटीज ने मराठी चित्रपट निर्मित केले असून सलमान खान, प्रियांका चोप्रा, अजय देवगण यांनी मराठी चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बॉलिवूडची अभिनेत्री सारिका लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहे. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी पारध या मराठी चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत गीत गाता चल, खुशबू, जानी दुश्मन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. रिस्पेक्ट या चित्रपटाच्या निमित्ताने त्या अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटात काम करणार आहेत. चित्रपटात सारिका यांची महत्त्वाची भूमिका असून निकटचा या चित्रपटाचे डबिंग संपले आहे. या चित्रपाटाचे दिग्दर्शन किशोर बेळेकर करीत आहेत. त्यांनी या चित्रपटाची माहिती देत सारिकांसोबतचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे.
सारिकाने चित्रपटांप्रमाणे मालिकांमध्ये देखील काम केले आहे. युद्ध या मालिकेमधून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत अमिताभ बच्चनसोबत त्यांची जोडी जमली होती. त्यानंतर डर सबको लगता है या मालिकेत देखील त्या झळकल्या होत्या. किशोर बेळकरने येडा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आशुतोष राणाची मुख्य भूमिका असलेल्या येडा या चित्रपटाचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यामुळे त्याच्या रिस्पेक्ट या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लोकांना लागली आहे. प्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांच्या पूर्वपत्नी सारिका यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दाक्षिणात्य इंडस्ट्रीत त्यांनी अनेक चित्रपट केले त्यांना तिकडे सुपरस्टार मानले जाते.