Birthday Special : Everything to know about ‘Prajakta Mali’

 

Prajakta Mali BD

प्रेक्षकांचा लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा आज वाढदिवस. या निमित्त जाणून घेऊ तिच्या विषयी काही खास गोष्टी.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हीचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ रोजी पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आई गृहिणी तसेच वडील पोलिस दलात कार्यरत आहेत. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून आपण तिला पहिले यानंतर प्राजक्ताने ‘प्लेझंट सरप्राईज’ या नाटकातुन रंगभूमीवर पदार्पण केले. पार्टी हा तिचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.छोट्या पडद्यावरील ‘गुडमॉर्निंग महाराष्ट्र’, ‘गाणे तुमचे आमचे’, साम मराठीवरील ‘सुगरण’, ‘फिरूनी नवीन जन्मेन मी’ या कार्यक्रमांमध्ये ती झळकली. ‘सुवासिनी’ या मालिकेमुळेच तिला केदार शिंदेच्या ‘खो-खो’ या सिनेमात काम करण्याचीही संधी मिळाली होती. झी मराठी वाहिनीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत मेघना हे पात्र तिने साकारले होते. तिची नकटीच्या लग्नाला यायंचं हं ही मालिकाही लोकप्रिय झाली होती. याशिवाय प्राजक्ताचे प्लेझंट सरप्राईज हे नाटक रंगभूमीवर बरेच गाजले. या नाटकात अभिनेता सौरभ गोखले तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता.

 

Prajakta Mali BD 02

प्राजक्ताच्या हातावर ‘ओशो’ असा टॅटू काढला आहे यावरून तिची ओशोंवर श्रद्धा असल्याचे समजते. विशेष म्हणजे तिने ‘रेशीमगाठी’ दरम्यान ओशो वर आधारित साहित्य वाचन केले आहे. तसेच त्यांच्या सीडी देखील ऐकल्या आहेत. प्राजक्ताच्या मते सतत जगण्याची प्रेरणा देत राहील असा टॅटू करण्याची तिची इच्छा या टॅटू मुळे पूर्ण झाली. या टॅटू विषयी सांगताना ती म्हणाली , “ओशो हे कुठल्या धर्माचे नाहीत. त्याप्रमाणेच मी धर्म, जात असे काही मानत नाही. ओशोंचे विचार ऐकल्यावर मी खूप प्रभावित झाले. अभिनेत्री असल्याने तो कोणाला दिसून येऊ नये यासाठी तो बोटांच्या मधल्या गॅपमध्ये गोंदवायचा होता पण तिथे फारसे मांस नसल्याने तो तिथे न गोंदवता मनगटाच्या जवळ गोंदावे लागले”.

 

Prajakta Mali BD 01

 

पुण्यातील ललित कला केंद्राची ती विद्यार्थिनी आहे. तिचा अभिनयाचा पाया ललित केंद्रामध्येच मजबूत झाला व तिने काही दिवस नृत्यदिग्दर्शिका म्हणूनही काम केले आहे. प्राजक्ताच्या कुटुंबातील एकही व्यक्ती कला क्षेत्रामध्ये नाही. पण तिच्या आईला कलेची लहानपणापासूनच खूप आवड होती, मात्र त्यांना कधी संधी मिळाली नाही. असे असल्या मुले आल्या मुलीने या क्षेत्रात करिअर करावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे अभिनेय क्षेत्रातील प्रेरणास्थान ती आपलय आईला मानते.

 

Prajakta Mali BD 03

 

दिवंगत दिग्दर्शक संजय सुरकर यांच्या २००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘तांदळा एक मुखवटा’ या सिनेमात प्राजक्ता सर्वप्रथम झळकली होती. त्यानंतर दिवंगत निर्मात्या-अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्या ‘सुवासिनी’ या मालिकेत ‘सावी’ हे पात्र साकारण्याची संधी तिला मिळाली. या मालिकेमुळे प्राजक्ता सर्वप्रथम प्रकाशझोतात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भविष्यकाळात तिला नृत्य क्षेत्रातील पीएच.डी करण्याची ईच्छा असून समाज व्यवस्था सुधारण्यासाठी राजकारणात देखील येण्याची इच्छा आहे.