Bharat Jadhav’s upcoming movie ‘Stepney’

मराठी चित्रपटातील विनोडचे बादशाह म्हणजे अभिनेता भरत जाधव. विनोद म्हटलं की भरत जाधव आणि भरत जाधव म्हटलं की विनोद, असे म्हणणे चुकिचे ठरणार नाही. लवकरच ते येत आहेत एक नवा कोरा विनोदी चित्रपट घेऊन ज्याचं नाव आहे ‘स्टेपनी’. भरत जाधव या चित्रपटात विनोदी भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘स्टेपनी’ या अतरंगी नावावरूनच चित्रपटात नक्कीच वेगळे काहीतरी पाहायला मिळणार अशे दिसतं आहे. नक्की या चित्रपटाची कथा काय आहे ? या प्रश्नाचं उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.

 

Stepny 01

 

अनेक वर्षा पासून अभिनेता भरत जाधव यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. ‘स्टेपनी’ या आगामी चित्रपटातून भरत जाधव पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता बऱ्याच दिवसांनंतर भरत जाधव चित्रपटातून दिसणार असल्यामुळे त्यांच्या फॅन्स ची उत्सुकता वाढलेली आहे.

 

Stepny 02

 

श्री गणराया फिल्म्स आणि अनंत भुवड, नरेंद्र जयस्वाल, भटूलाल जयस्वाल यांनी ‘स्टेपनी’ या चित्रपटची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजीज नासीर यांनी केले आहे.मुरली कृष्णा यांनी या चित्रपटाचे छायांकन केले आहे. रोहित नागभिडे यांनी या चित्रपटाला संगीत दिले असून राजेश एस. एस. यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. ‘स्टेपनी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.