Ankush Chaudhari honoured to be the brand Ambassador of Pro-Kabaddi

Ankush Choudhari for Pro Kabaddi 02

श्वासात घुमणारा कबड्डीचा आवाज… ऐटीत मांडीवर थोपटली जाणारी विजयाची थाप… आणि वर्चस्वाची सांघिक जिद्द! मराठी मातीतून आंतरराष्ट्रीय मॅटवर गाजत असलेल्या या ‘कबड्डी’ खेळाची ख्याती सर्वत्र पसरत आहे. आणि आता अभिनेता अंकुश चौधरी यात ‘यू मुंबा’ आणि ‘पुणेरी पलटण’ या दोन संघांचा चेहरा म्हणून स्पर्धेत उतरणार आहे.

Ankush Choudhari for Pro Kabaddi 01

‘प्रो कबड्डी’ च्या या नव्या सीझन ला आज दि. २८ जुलै पासून सुरुवात होत आहे. मागील चार वर्षे मोठ्या जल्लोषात पार पडले व या वेळी हि स्पर्धा महाराष्ट्रासाठी खूप खास असणार आहे. या विशेष करणामागे आहे सुपरस्टार अभिनेता अंकुश चौधरी कारण या सीझन साठी तो ‘यू मुंबा’ आणि ‘पुणेरी पलटण’ या दोन संघांचा चेहरा म्हणून स्पर्धेत उतरणार आहे.

Ankush Choudhari for Pro Kabaddi 03

महाराष्ट्राच्या या दोन्ही संघांचा ब्रँड अॅम्बेसिडर होणे हि अंकुश साठी खूप आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या मातीतून वर आलेल्या या खेळाला प्रो कबड्डी सामन्यामुळे ग्लॅमर्स स्वरूप प्राप्त झाले आहे हे म्हणणे चुकिचे ठरणार नाही. महाराष्ट्राच्या दोन संघांचा प्रतिनिधी म्हणून अंकुश चौधरी या मराठी अभिनेत्याची निवड होते, ही सन्मानाची बाब आहे. अंकुशच्या सहभागामुळे महाराष्ट्राच्या कबड्डी प्रेमींसाठी यंदाचा पाचवा हंगाम दुहेरी धम्माल देणारा ठरणार आहे. २८ जुलैपासून सुरू होत असलेल्या या सामन्याचा लाईव्ह थरार स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर तसेच ऑनलाईन हॉटस्टार वर पाहता येईल.