स्टाइलमध्ये असावी ओरिजनॅलिटी – तेजस्विनी पंडितचा स्टाईल फंडा !

सिनेइंडस्ट्री असो किंवा कॉर्पोरेट या सगळीकडेच स्टाइल बघायला मिळते. माझ्या दृष्टीने ज्यांच्याकडे उत्तम स्टाइल आहे त्यांच्याकडे ओरिजनॅलिटी असते. स्टायलिश राहण्यासाठी आधी तुम्ही तुमची ओरिजनॅलिटी जपणे महत्त्वाचे असते. स्टाइलनुसार तुम्ही तुमची पर्सनॅलिटीला कसे कॅरी करता हे महत्त्वाचे आहे. तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्यात एक आत्मविश्वास आणि अ‍ॅटिट्युड असला तर तुमच्या पर्सनॅलिटीला आपोआप एक वेगळी स्टाइल मिळते. मी स्वत:ला स्टायलिश बनवण्यासाठी स्पेसिफिक कोणाला फॉलो नाही करत, कारण ट्रेंड्स येतात आणि जातात. फॅशनही खूप लिमिटेड आहे. काही गोष्टी अशा आहेत, की त्या आजही पूर्वीच्या फॉलो केल्या जातात. उदाहरणार्थ जीन्स खूप पूर्वीपासून आपण आजही वापरतो आहे. मी सगळ्या पॅटर्नच्या कपड्यांमध्ये कॅम्फर्टेबल असते. मला जास्त टी-शर्ट, शॉर्टस, जीन्स घालायला आवडतात. साड्यांचीही मला आवड आहे. मला रिंग्ज, शूवेअरची खूप आवड आहे, माझ्या वॉर्डरोबमध्ये या गोष्टींचे खूप सारे कलेक्शन आहेत. मोत्यांचे दागिनेही खूप आवडतात. माझ्या घरी चप्पल्स, शूजचे कलेक्शन हे कपड्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे घरी मला मुद्दाम चिडवतात, की तू आता चप्पलांचे दुकान उघड… मराठीत सई, अमृता, नेहा पेंडसे, अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, उमेश कामत हे सगळे खूप चांगल्या प्रकारे स्टाइल कॅरी करतात. बॉलिवूडमध्ये सोनम कपूरची स्टाइल आवडते. रणवीर सिंग काहीतरी विअर्ड स्टाइल करतो पण मला ते आवडते आणि दुसरे नाव म्हणजे फरहान अख्तर यांची स्टाइलही खूप उत्तम वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published.