सैराटचित्रपटात झळकलेल्या तानाजीने खऱ्या आयुष्यात बाजी मारली..

सैराट चित्रपटात परश्याचा मित्राची भूमिका करून चित्रपटात हास्यकल्लोळ घडवून आणलेल्या “बाळ्या, लंगड्या उर्फ प्रदीप’ची चर्चा राज्यभर झाली आहे.

तानाजी गळगुंडे हा माढा तालुक्यातील बेंबळे गावामध्ये राहतो. तानाजी टेंभुर्णी येथील महाविद्यालयात बी. ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. त्याला बारावीत ७० टक्के गुण होते.

Tanaji
Tanaji-The-Hero

शारीरिक ‘अपंगत्व’ असले तरीही आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलेच्या माध्यमातून करिअर करता येते, हा तानाजीने समाजाला सिद्ध करून दाखवले आहे.बेंबळे ग्रामस्थांच्या वतीने तानाजीच्या सत्कार करण्यांत आला व अपंग कोट्यातून ५० हजार रुपये किमतीचे झेरॉक्स मशीन तानाजीला देण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले.

तानाजीने बेंबळे गावात प्रवेश करताच ग्रामस्थांनी ढोल ताशा हलग्या वाजवत गुलालाची उधळण करत त्याचं कौतुक केलं.

Leave a Reply

Your email address will not be published.