अन्वेषा दत्तागुप्ता गाणार मराठी गाणं !

अन्वेषा दत्तागुप्ता गाणार मराठी गाणं

‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटातील ‘जलते दियेन हे गाणे रसिकांना प्रचंड आवडले होते.तसेच जॅम रूम मधेही अन्वेषा ने बरेच बॉलीवूड ओल्ड सॉंग्स रीमिक्स करून गायले आहेत . व आत तिचा आवाजाला रसिकप्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे .अन्वेषा दत्तागुप्ता लवकरच एका मराठी चित्रपटासाठी गाणार आहे. अन्वेषाने आतापर्यंत अनेक हिंदी, बंगाली, कन्नड आणि तमीळ चित्रपटांत गाणी गायली आहेत. मराठी चित्रपटासाठी गाण्याची अन्वेषाची ही पहिलीच वेळ आहे . मराठीत गाण्यासाठी सध्या ती खूप उत्सुक आहे. भाऊराव कऱ्हाडे यांच्या ‘ख्वाडा’ या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटानंतर आता भाऊराव ‘बबन’ हा त्यांचा दुसरा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे पहिले पोस्टर आल्यापासूनच या चित्रपटाविषयी सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटावर सध्या त्यांचे काम सुरू असून, या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ते लवकरच सुरुवात करणार आहेत. बबन या चित्रपटांच्या गाण्यांवर सध्या भाऊराव आणि त्यांची टीम काम करीत आहे. या चित्रपटातील एक गाणे अनेक हिंदी चित्रपटात गाणी गायलेली गायिका अन्वेषा दत्तागुप्ता गाणार आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग लवकरच यशराज स्टुडिओत होणार आहे. याविषयी या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊसाहेब सांगतात, ‘बबन या चित्रपटातील गाण्यासाठी अन्वेषा अगदी योग्य असल्यावर आमच्या सगळ्यांचे एकमत होते. मराठी चित्रपटासाठी गाण्याची तिची ही पहिलीच वेळ असल्याने ती यासाठी खूपच मेहनत घेत आहे. तिला मराठी येत नसले, तरी प्रत्येक उच्चार ती आमच्याकडून समजून घेते. रसिकांना तिचे हे गाणे प्रचंड आवडेल याची मला खात्री आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published.