Watch official teaser of ‘kaasav’

Kaasav trailer 01

 

सुवर्णकमळ प्राप्त ‘कासव’ या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आणि आता सर्वत्रच या चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळत आहे.इरावती हर्षे, आलोक राजवाडे, डॉ. मोहन आगाशे आणि किशोर कदम यांच्या दमदार अभिनयाने परिपूर्ण ‘कासव’ चित्रपटाची निर्मिती सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी केली आहे. तर डॉ. मोहन आगाशे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

 

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.  या ट्रेलर मुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची झलक पाहायला मिळाली आहे. समुद्राच्या ओढीने आत जाणारा नायक आणि ‘घे ओढुनी सर्वत्र, विशे आतुनी इंद्रिये. जसा कासव तो अंगे, तेव्हा प्रज्ञा स्थिरावते’ असा मागून ऐकू येणारा आवाज म्हणजे ‘कासव’. अनेक जण नायकाच्या अबोल वृत्तीला उलगडू पाहतायत, पण नायक स्वतःत काहीतरी साठवून आहे. टणक कवचाखाली लपवलेलं त्याचं स्वत्व समुद्राच्या आणि कासवाच्या ओढीने खेचलं जातंय, शांत दिसणाऱ्या समुद्रा.

 

‘अस्तु’ नंतर पुन्हा एकदा वेगळ्या धाटणीचा हा सिनेमा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनेक पुरस्कारांनी गौरविलेला ‘कासव’ आता प्रदर्शनासाठी सज्ज असून ६ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.