‘Vitthala Shappath’ Motion Poster released

Vitthal Shappat 01

 

महाराष्ट्राचे आराध्य आणि लाडके दैवत म्हणजे विठ्ठल. विठ्ठलभक्ती आणि त्याविषया संदर्भात आजपर्यंत अनेक चित्रपट बनवले गेले आहेत. असे असले तरी विठ्ठल हा आजही मराठी चित्रपटसृष्टीचा आवडता विषय आहे.

 

असाच एक नवा चित्रपट तुमच्या भेटीसाठी येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘विठ्ठला शपथ’ असून हा चित्रपट श्रद्धेवर आधारित चित्रपट असून अंधश्रद्धेला यात अजिबात थारा नाही असे दाखवण्यात आले आहे. नुकतेच ‘विठ्ठला शपथ’ या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच करण्यात आले. या मोशन पोस्टरमध्ये विठुरायाचे लोभस रूप पहायला मिळते. गुरूदर्शन फिल्म्स दिग्दर्शित आणि चंद्रकांत पवार निर्मित ‘विठ्ठला शपथ’ या चित्रपटाचे पोस्टर अत्यंत वेगळ्या संकल्पनेवर आधारित आहे.

 

‘विठ्ठला शपथ’ या चित्रपटाचे कथा लेखन व दिगदर्शन चंद्रकांत पवार यांनी केले असून कौस्तुभ सावरकर आणि भानुदास पन्मंद यांनी डायलॉग लिहिले आहेत. या चित्रपटातील गाणी क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत. गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी यांची निर्मिती असलेला ‘विठ्ठला शप्पथ’ हा आगामी मराठी चित्रपट १५ सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.