Ranjan : The Upcoming Love Story Blossoms In A School

Ranjan 01

२०१७ ची सुरवात ती सध्या काय करते हा प्रेमकथेवर आधारित चित्रपटाने केली . सतिश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. माणसाच्या आयुष्यात असणारे पहिले प्रेम व त्याच्या आठवणी या वर अधरती आसा हा चित्रपट होता.

आता या चित्रपटानंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ‘रांजण’ हा चित्रपट.’रांजण’ या चित्रपटात शाळेत फुलणारी एक हळूवार प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेमाद्वारे एक सामाजिक संदेश मांडणारा आसा हा चित्रपट असणार आहे . तसेच यश आणि गौरी असे दोन नवे कलाकार या चित्रपटामध्य आपलायला पाहायला मिळणार आहेत.
शाळकरी मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेमकथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. रांजण ही प्रेमकथा प्रेम, आकर्षण या भावनांच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक विचार मांडणार आहे. मुलांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन या चित्रपटात दाखवला जाणार आहे. महागणपती एंटरटेन्मेंट चा रांजण हा चित्रपट आहे.रांजण या चित्रपटातील ‘लागीर झालं रं’ हे गाणे सोशल मेडिकल वर आपल्याला पाहायला मिळेल. सध्या या गाण्याला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली आहे. हे गाणे अजय गोगावलेने त्यांच्या खास शैलीत गायलं आहे.या गाण्याचे बोल वैभव जोशीने लिहिले असून नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे . या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश पवार यांनी केले आहे.

‘लागीर झालं रं’ या गणायच्या प्रदर्शना नंतर रांजण या चित्रपटाची चर्चा सर्व ठिकाणी रंगली आहे. तसेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशलमीडियावर प्रदर्शित झालय नंतर प्रेक्षकांची भरभरून पसंतीदेखील मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

यापूर्वी अजय- अतूल यांच्या सैराट या चित्रपटातील गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश्या वेड लावले होते .अजूनही ती गाणी आपल्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत . रांजण च्या माध्यमातुन पुन्हा ही जोडी रसिकांना मंत्रमुग्ध करणार असे दिसत आहे . अजयने लागीर झाला हे गाणे एकदम रांगडया आवाजात गायले आहे. त्याने गायलेल्या या गाण्याला मिळालेल्या प्रसिद्धी नंतर रांजण या प्रेमकथादेखील प्रेक्षकांचा उत्सुफूर्त प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.