Upcoming Marathi Movie “radio nights 6 . 06 Poster is out

‘तुजविण सख्या रे’ या मालिकेमुळे घराघरांत पोहचलेले अभिनेता गौरव घाटणेकर आणि अभिनेत्री कादंबरी कदम खूप लोकप्रिय झाले. मालिकेतील दोघांची ऑनस्क्रीन लव्हस्टोरी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. आता ही जोडी पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रिनवर येण्यासाठी सज्ज झाली आहे.गौरव आणि कादंबरीचा हा सस्पेन्स-थ्रीलर चित्रपट प्रेक्षकांना कितपत भावतो हे आपल्याला फेब्रुवारी मधेच समझेल .

गौरव आणि कांदबरी लवकरच एक सिनेमा घेऊन येणार आहे, नुकतंच गौरवने त्याच्या सोशल साईटवर या सिनेमाचं म्हणजेच ‘रेडिओ नाईटस् ६.०६’ चं पोस्टर शेयर केलं आहे. या सिनेमाद्वारे ही दोघं पुन्हा एकदा एकत्र येत असून हा एक सस्पेन्स-थ्रीलर सिनेमा आहे.‘तुजविण सख्या रे’ मालिकेनंतर गौरव आणि कादंबरीची सिनेमातील केमिस्ट्री कशी जुळेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्राईम डायरेक्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘रेडिओ नाईटस् ६.०६’ या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद आचरेकर यांनी केले आहे. सिनेमाची तारीख जरी अजून कळली नसली तरी २०१७ मध्ये सिनेमा प्रदर्शित होईल एवढं मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published.