Umesh Kamat to portray the father of Neuro Spinal Surgery Honourable Dr.P.S.Ramani

Taath Kana 04

 

लावकाचं डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘ताठ कणा The power of imagination’ हा चित्रपट तुमच्या भेटीसाठी येत आहे. डॉ. प्रेमानंद रामाणी हे जगातील एक प्रमुख स्पाईनल सर्जरी करणारे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यांच्या आत्मचरित्रांवर आधारित या चित्रपटामध्ये अभिनेता उमेश कामत त्यांची भूमिका साकारणार आहेत.

 

‘ताठ कणा’ हा चित्रपट प्रज्ञा क्रिएशनची निर्मिती असून या चित्रपटाची पहिली झलक माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सादर करण्यात आली. विजय मुडशिंगीकर, नीलम मुडशिंगीकर, करुणा पंडित या चित्रपटाचे निर्माते असून या चित्रपटाचे दिग्दर्शन दासबाबू करणार आहेत. टायचप्रमणे कथा-पटकथा-संवाद श्रीकांत बोजेवार यांचे असून संगीत राजेश धाब्रे यांचे आहे. या प्रसंगी बोलताना अभिनेता उमेश कामत यांनी सांगतिले कि, डॉ. प्रेमानंद रामाणी यांची भूमिका साकारणे हि त्यांच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तसेच त्यांनी आजपर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी ही सर्वात आव्हानात्मक भूमिका आहे. डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या मते त्यांचा जीवनप्रवास उमेश खूप चांगल्या रीतीने साकारेल.

 

Taath Kana 03

 

पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया करण्यात जगातले अनेक डॉक्टर्स ही सर्जरी यशस्वी करण्यासाठी धडपडत होते, परंतु कुणालाही ते तंत्र जमत नव्हते. अशावेळी भारतात डॉ. रामाणी यांनी ते शक्य करून दाखवले. या तंत्राला प्लिफ (Posterior Lumber Interbody Fusion) हे नाव त्यांनी दिले आणि या नंतर डॉ. रामाणी यांना ‘प्लिफ रामाणी’ या नावाने वैद्यकीय जगतात ओळखले जाऊ लागले.

 

Taath Kana 02

 

धैर्य, चिकाटी, ध्यास आणि प्रयत्न यांचा अनोखा संगम म्हणजे डॉ रामाणी. आपलं यश त्यांनी कधीच पैशात मोजले नाही ते त्यांनी मोजले ते रूग्णाच्या हास्यात . वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षीही रोज त्याच एकाग्रतेने आणि उत्साहाने शस्त्रक्रिया करणाऱ्या चिरतरूण डॉक्टर रामाणी यांच्या प्रेरणादायी आयुष्याची कहाणी पहा ‘ताठ कणा’-The power of imagination या चित्रपटामध्ये.