‘Tula Kalnaar Nahi’ to release on 8th September

Tula Kalnar Nahi 8 sep 01

सुप्रसिद्ध दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे जोशी या कायम आपल्या चित्रपटातून प्रेमाची आणि मैत्रीची नवी परिभाषा मांडण्याचा प्रयत्न करत असतात. ‘तुला कळणार नाही’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल नेटवर्किंग साईट वर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपाटाच्या मुख्य कलाकारांची ओळख या पोस्टर मुळे झाली. ‘तुला कळणार नाही’ या चित्रपटाचे निर्माते अभिनेता स्वप्नील जोशी असून हा चित्रपट सिनेकॉर्न इंडिया यांच्या सक्षम फिल्म्स आणि जीसीम्स यांची प्रस्तुत आहे. याच प्रमाणे श्रेया योगेश कदम, अर्जुन सिंघ बरन आणि कार्तिक निशानदार हे सुध्दा या चित्रपटाचे निर्माते आसून निरव शाह, ईलाची नागदा आणि जयेश मुझुमदार हे सह-निर्माते आहेत.

 

‘तुला कळणार नाही’ या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आहेत.बॉलिवूडमधील शाहरुख खान आणि काजोल यांनी साकारलेली राहुल आणि अंजलीची प्रेमकथा तर साऱ्यांनाच माहित आहे. या प्रेम कथेचे आजही अनेकजण दिवाने आहेत. पण त्या सिनेमात त्यांची लग्नापर्यंतचीच प्रेम कथा दाखवण्यात आली होती. लग्न झाल्यानंतर त्यांचे काय होते हे सांगणारी कथा मन्हजे ‘तुला कळणार नाही’ हा आगामी चित्रपट.

 

सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतेच प्रदर्शित केलेल्या ‘तुला कळणार नाही’ या सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये त्यांचा आवाज ऐकू येतो. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांचे ते आवाज असल्याचे आपल्याला जाणवते. इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करताना तिने ‘लग्नाची बेडी वजा प्रेमाची गोडी… कशी तरेल ह्यांच्या संसाराची होडी?’ असे अनोखे कॅप्शनही दिले.‘तुला कळणार नाही’ हा चित्रपट ८ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.