Rakesh Bapat to play the role of Rajan in upcoming movie

Rajan article 03

 

‘राजन कमिंग सून’ अशी टॅगलाईन असलेलं ‘राजन’ या सिनेमाचे टीजर पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते . या टीझर पोस्टर मुळे प्रेक्षकांमध्ये भरपूर उत्सुकता निमार्ण झाली. या नंतर हा राजन नक्की आहे तरी कोण आसा प्रश्न सर्वांना पडला होता. या चित्रपटातील राजन हि प्रमुख भूमिका कोण करणार यावर सगळ्यांचा लक्ष केंद्रित झाले होते. या प्रश्नच उत्तर आता मिळालं असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील देखणा अभिनेता राकेश बापट राजनची भूमिका साकारणारआहे. राकेश बापटने हिंदी चित्रपटसृष्टीत आपली विशेष ओळख निर्माण केली असून मराठीतही आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘राजन’ या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक भरत सुनंदा असून रिदम मुव्हीज प्रस्तुत वंश एंटरप्राईजेस’ यांची निर्मिती आहे.

 

Rajan article 02

 

‘राजन’ या वेगळ्या नावामुळे या चित्रपटाविषयी सगळीकडे चर्चा होतीच पण फक्त शीर्षक असे असून हा चित्रपट कोणाच्याही व्यक्तिगत आयुष्यावर आधारित आहे. ‘राजन’ हा चित्रपट वास्तविक जीवनावर बेतला आहे. १९८३ ते १९९३ सालातली मुंबई आणि त्यावेळचा गँगवॉर आजच्या पिढीलासुद्धा कळले पाहिजे याचा विचार करुन या चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले आहे, असे दिग्दर्शक भरत सुनंदा यांनी एक मुलाखतीत सांगितले होते.वामन पाटील, दिप्ती बनसोडे आणि सुरेखा पाटील यांची असलेल्या या चित्रपटात,तुषार पटेल यांनी कार्यकारी निर्मात्याची भूमिका पार पाडली आहे. राकेश बापट राजनच्या भूमिकेत नक्की कसा दिसेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.