Marathi Bigg Boss season- 2 coming soon.

बिग बॉस चे मराठी मधील पहिले पर्व खूप गाजले. आता या परवाच्या यशानंतर, कलर्स मराठी आता घेऊन येत आहे बिग बॉस मराठी कार्यक्रमाचा दुसरे पर्व. पहिल्या पर्वामध्ये महेश मांजरेकर यांचा सूत्रसंचालनाच्या अनोख्या स्टाईलने प्रेक्षक आणि सदस्य सगळ्यांचीच मने जिंकली. तर आता पुन्हा आपले लाडके महेश मांजरेकर बिग बॉस मराठी च्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमाचा प्रोमो काही दिवसं पूर्वी आला होता. या प्रोमोमध्ये ते आपलायला राजकीय नेत्याच्या वेशभूषेत दिसले होते. या वेषभूषेमुळे या वेळेस बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एखादी राजकीय क्षेत्रातील व्यक्ती तर दिसणार नाही ना ? अशी शंका सर्व प्रेक्षकांच्या मनात आहे.

 

Bigg Boss season two 02

 

सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक बिगबॉस च्या नवीन पर्वाबद्दल खूप उत्सुक आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या वेळेस कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील याविषयाचे तर्क वितर्क सुरु आहेत. संपूर्ण भारतात “बिग बॉस” हा सगळ्यात उत्कंठावर्धक कार्यक्रम आहे असे म्हणणे चुकिचा ठरणार नाही. तसेच हा कार्यक्रम अनेक प्रादेशिक भाषा म्हणजेच हिंदी, मराठी, कन्नड आणि तमिळ मध्ये खूप प्रसिद्ध आहे. हिंदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुपरस्टार सलमान खान करतात.

 

Bigg Boss season two 01

 

लवकरच या दुसऱ्या परवाच नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या प्रोमोमध्ये त्यांचा अस्सल मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये त्यांचा फेटा, कुर्ता असा लुक दिसणार आहे. प्रोमो एका चित्रपटामधील क्लिप सारखा दिसत आहे ज्यामध्ये सुंदर लावणी सादर होताना दिसत आहे. हे वाचल्यावर, कोणी या कलेशी संबधीत व्यक्ती तर बिग बॉस मराठीच्या घरात जाणार नाही ना ? हा प्रश्न प्रेक्षकांना पडू शकतो. नक्की काही असेल हे लवकरच आपण सर्वाना कळेलच.