Lead actress Rinku aka Archie will now be seen in Sairat Kannada remake

नागराज मंजुळे दिग्दर्शित  हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरला. २०१६चे वर्ष खऱ्या अर्थाने सैराटने गाजवले.

या सिनेमाची कथा, पात्रे, संवाद या सगळ्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या सिनेमातून दोन नव्या चेहऱ्यांनी सिनेसृष्टीत प्रवेश घेतला. रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर. रिंकूला या सिनेमातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारावरही बाजी मारली.

rinku rajguru
Sairat – Remake

मात्र तुम्हाला माहीत आहे का सैराट सिनेमानंतर रिंकू सध्या काय करतेय? सैराट सिनेमाच्या अत्युच्च यशानंतर अनेक भाषांमध्ये या सिनेमाचा रिमेक होणार असल्याची घोषणा करण्यात आली. कन्नड या भाषेत या सिनेमाचा रिमेक होतोय. या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झालेय. विशेष म्हणजे सैराटची आर्ची म्हणजेच रिंकू यात पुन्हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

सैराटच्या कन्नड रिमेक सिनेमाचे नाव मनसु मल्लिगे असे आहे. इंडियन एक्स्प्रेस या वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, येत्या ९ फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होतोय. रिंकूसह परश्याची भूमिका अभिनेता निशांत करतोय. निशांत हा प्रसिद्ध अभिनेते प्रकाश यांचा मुलगा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.