Director Sanjay Jadhav to play female role in upcoming movie: Lagna Mubarak

दिग्दर्शक संजय जाधव पहिल्यांदाच आपले अभिनय कौशल्य प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे . संजयने दिग्दर्शक म्हणून अनेक हिट सिनेमे मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. दुनियादारी चित्रपटाने त्यांना महाराष्ट्राच्या घरोघरी पोहचवाले इतकाच नाही तर बॉक्स आॅफिसवर देखील भरगोस कमाई केली. आजपर्यंत दिग्दर्शक म्हणुन ओळखले जाणारे संजय जाधव लवकरच अभिनेता म्हणुन आपली नवी ओळख बनवणार आहेत असं दिसतंय.

Sanjay Jadhav Lagna Mubarak 02
दिग्दर्शक संजय जाधव आता आपल्या समोर अभिनेता म्हणून लावलाच येणार आहेत . ‘संजय जाधव’ लग्न मुबारक या आगामी चित्रपटात मुस्लिम स्त्री च्या भूमिकेत दिसणार आहेत. लग्न मुबारक या आगामी चित्रपटानिमित्त संजय जाधव यांचा हा हटके अंदाज प्रेक्षकांना समोर येणार आहे . दिग्दर्शक संजय जाधव हे या चित्रपटासाठी असलेल्या त्यांच्या कॅरेक्टर साठी स्त्रीवेष धारण करणार आहेत. मेकअप आर्टिस्ट हर्षद खुले यांनी संजय जाधव  यांना स्त्री व्यक्तिरेखेत सादर करण्याची कमाल केली आहे . मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचे मेकअप करणारे हर्षद खुले यांना संजय जाधव यांचा स्त्री वेशातील मेकअप करणे आव्हानात्मक वाटले होते असे त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीती सांगतले. हर्षदला जेव्हा समजले कि त्याला संजय जाधव यांचा मेकअप करायचा आहे आणि तो देखील मुस्लिम व्यक्तिरेखेमधील स्त्री प्रमाणे तेव्हा त्यांना थोडा टेन्शन आले होते. आशय आगळ्या वेगळ्या मुस्लिम व्यक्तिरेखेत संजयला सादर करण्याचा चॅलेंज त्यांनी स्वकारला होता . या मुस्लिम व्यक्तिरेखेमधील स्त्री प्रमाणे संजय जाधव याना तयार करत असताना त्यांच्या मनात थोडी भीती होती. काजळ लावण्यापासून ते साडी नेसविण्यापर्यंत सर्व गोष्टी त्यांनी विशेष लक्षपूरकव केल्या आणि ज्यावेळी त्यांचा मेकअप पूर्ण झाला तेव्हा स्वतः संजयने त्याचे कौतुक केले. मेकअप पूर्ण झाल्यानंतर मी खरच या वेशात स्वतःला ओळखूच शकत नाहीये असे ही संजय त्याला म्हणाले. विशेष म्हणजे सेट वर उपस्थित महेश मांजरेकर , मेधा मांजरेकर व इतर सर्वानी संजय जाधव यांचा मेकअप पाहून हर्षद खुले याचे कौतुक केले.

Sanjay Jadhav Lagna Mubarak 01
त्यांचा या दमदार मुस्लीम कॅरेक्टरसाठी त्यांना डोळ्यात काजळ घालणे आवश्यक होते . पण काजळ घालताना डोळे खुप दुखतात, माझ्या डोळ्यातून पाणी येते म्हणुन संजयने सुरुवातीला काजळ घालण्यास मनाई केली होती. मेकअपमॅन हर्षदने आपले कौशल्य दाखवत अगदी सहजपणे संजयच्या डोळ्यात काजळ घातले आणि संजयला ते आवडले देखील.
‘लग्न मुबारक’ या चित्रपटामध्ये संजय जाधव ,अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, संस्कृती बालगुडे, आणि सिदधांत मुळे हे कलाकारल असणार आहेत. संजय प्रथमच अभिनय करणार आणि ते ही अशाच वेगळ्या लुकमध्ये ,त्यामुळे त्यांची हि भूमिका पाहण्यास सर्वजण उत्सुक आहेत हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published.