Dashami creation announces upcoming movie ‘Muramba’

Muramba 01
सुप्रसिद्ध दशमी क्रिएशन्सने मुरांबा या त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या आधी दुर्वा, माझे मन तुझे झाले, बे दूणे दहा या मालिकांची निर्मिती त्यांनी केली होती.या मालिकान प्रेक्षकांनि भरपूर पसंती दाखवली होती . दुर्वा या मालिकेला विशेष यश मिळाले होते व या मालिकेमुळे दशमी प्रोडक्शन बद्दल चंगली चर्चा सर्वत्र झाली होती . या मालिकेला मिळालेल्या भरपूर यश नंतर दशमी प्रोडक्शन चित्रपटांकडे वळले आणि घंटा या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती.
घंटा या चित्रपटामध्ये अमेय वाघ, आरोह वेलणकर आणि सक्षम कुलकर्णी या मराठीतीळ नावाजलेल्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्या बरोबर पुष्कर श्रोती, मुरली शर्मा, अनुजा साठे-गोखले, विजू खोटे यांच्या सारखे इतर मराठी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते.मुंबईत स्ट्रगल करत असेलेले तीन मित्र जगण्यासाठी काय काय उद्योग करतात हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू करू शकला नाही.शैलेश काळे यांनी घंटा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सुमित बोनकर आणि राहुल यशोद यांनी या चित्रपटाची कथा लिहिलि होती.
या चित्रपटानंतर आता दशमी प्रोडक्शनचा मुरांबा हा नवा चित्रपट घेऊन येत आहे. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवरून नुकतीच या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटाच्या घोषणेबरोबर चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक मुलगा आणि एका मुलीचे केवळ पाय दिसत असून त्या दोघांच्या हातात ग्लास आहे आसे हे पोस्टर आहे. मुरांबा या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण नार्वेकर करणार आहेत.

मुरांबा या चित्रपटाची जाहीर घोषणा जरी दशमी प्रोडक्शन हाऊसने केली आहे तरी या चित्रपटात कोण कलाकार असणार आहेत ते अजून गुप्ता ठेवण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.