Upcoming movie : Truckbhar Swapna

नितीन चंद्रकांत देसाई यांनी नेहिमीच वेगळे चित्रपट देण्याचा प्रयत्न केला आहे. नितीन चंद्रकांत देसाई हे स्वताः अभिनेते, चित्रपट- कलादिग्दर्शक, दिग्दर्शक तसेच निर्माते म्हणून प्रसिद्ध आहेत. यावेळी ‘ट्रकभर स्वप्न’ हा चित्रपट ते घेऊन आले आहेत. आज आपल्या देशात होणारे सरकारी खात्यातील बदल व या बदलेल्या नियमांमुळे समाजतल्या सामान्य कुटुंबावर होणार परिणाम यावर हा चित्रपट आधारित आहे . आयकॉनिक चंद्रकांत प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड हा चित्रपट सादर होणार आहे. प्रमोद पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे मकरंद देशपांडे ,क्रांती रेडकर हे कलाकार प्रमुख भूमिका करणार आहेत. सर्व सामान्य कुटुंबाच्या महात्वाकांक्षेवर आधारित आसा हा चित्रपट आहे.

Truckbhar Swapna 02
या आधी अनेक मराठी चित्रपटातून महाराष्ट्राचं राजकारण, राजकीय डावपेच, कूटनीति, सत्ताकारण दाखवण्यात आले आहे. राजकारण म्हटलं तर राजकारणावर आधारित सामना,सिंहासन,वझीर,सरकारनामा,गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा असे काही चित्रपट लगेच तुमच्या डोळ्यासमोर येतील. आपल्या आयुष्यात घेणाऱ्या गटांना तसेच आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना यावर आधारित चित्रपट पेरक्षकांना आवडतात. चित्रपटामधून अनेक सामाजिक विषय पेरक्षकांसमोर मांडले जातात व या चित्रपटामधून जनजागृती केली जाते. प्रेक्षकांना विशेष उत्सुकता असलेला एक मुद्दा म्हणजे राजकारण . बदलत्या नेते, पक्ष व नवीन येणारी सत्ता त्यांचा सर्व सामान्य नागरिकांवर आणि त्याबरोबरच शहरांवर होणार परिणाम रूपेरी पडद्यावर पाहणे रसिकांच्या नेहमीच पसंतीस उतरलेला आहे. राज्यात नुकत्याच पालिका निवडणुकांचे झाल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबई शहराच्या आर्थिक उलाढाली सांभाळणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सूत्र अनेक वर्षांपासून निरंतर सुरु आहे. आणि आता विश्वनाथ महाडेश्वर यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती झाली असून,त्यांचा नवा कार्यकाल शहराला लागू होणार आहे. राजकनरमध्ये होणारी अधिकाराची ही खांदेपालट सामान्य जीवनात कशापद्धतीने परिणाम करते,हे पाहणे सगळया उत्सुकतेचे ठरणार आहे . याच विचारांवर आधारित चित्रपट ‘ट्रकभर स्वप्न’ लवकरच प्रेक्षकांनचे मनोरंजन करणार आहे.

Truckbhar Swapna 03

सामान्य माणसाच्या इच्छा आकांक्षा यांची हृदयस्पर्शी कथा मांडणारा ‘ट्रकभर स्वप्न’ हा कौटुंबिक सिनेमा लवकरच सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.