Upcoming Movie Bablee Poster revealed

Bablee 01

 

विविध आशयघन कथेवर आधारित मराठी चित्रपट सध्या बनवले जात आहेत.चित्रपटांनी उत्तम यश मिळवत जगभरातील मराठी रसिकांचा आनंद द्विगुणित केला आहे. देशविदेशांतील सिनेमहोत्सवांमध्ये असे चित्रपट आपली वेगळी ओळख निर्माण करून मराठीची पताका उंचावत आहेत. विशेष म्हणजे काही चित्रपट थेट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवतात. सध्या विषयाचे वेगळेपण ही मराठी चित्रपटांचा कणा बनला आहे. असाच एका वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट लवकरच तुमच्या भेटीसाठी येत आहे. ‘बबली’ असे या चित्रपटाचे नाव असून हा भावनिक कथेवर आधारित चित्रपट आहे.

 

आपण सर्रास आपल्या मुलांना कुठल्यातरी टोपण नावाने बोलावत असतात. सोनू ,बेबी, बंटी, पिंकी,पप्पू ,बिट्या ,बबली किंवा तत्सम. जशी मुले मोठे होतात ही टोपण नावं, हवी-नको असली तरी, चिकटूनच राहतात. तर असच एक बबली नावाचा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी येतोय. एका गोड मुलीची कहाणी बबली या चित्रपटात दाखवली जाणार आहे. ‘बबली’ मधून एका गोड मुलीचा प्रवास अगदी लहानपणापासून ते तिच्या तारुण्यातील लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहचण्यापर्यंतचा दाखवला आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर लाँच करण्यात आले.

 

आपल्या संस्कृतीत समोरच्याला आदराने दादा, ताई, काकू, भाई अशा विविध आदरार्थी वचनांनी संबोधले जाते असे. परंतु हल्लीच्या तरुणाईमध्ये दादा किंवा ताई म्हटलं की त्यांना सहसा ते आवडत नाही.‘बबली’ या चित्रपटाची टॅग लाईन ‘तू काही बी म्हण बबले पण दादा नको म्हणू’ अशी आहे. रॉबर्ट मेघा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा सतीश सामुद्रे यांची असून त्यांनीच निर्मितीची जबाबदारी घेतली आहे. पॅशन मुव्हीज प्रा.ली.ची प्रस्तुती असलेला ‘बबली’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.