Once More upcoming Marathi movie releasing tomorrow.

Once more 02

 

आपल्या आयुष्यात अनेक नाती बनतात व प्रत्येक नात्याची एक वेगळी गंमत असते… या मधलं एक नातं म्हणजे नवरा बायकोचं हे नातं अतिशय अनाकलनीय असतं. अनेकदा असं होतं कि कधीच एकमेकांना पाहिलेले नसताना सुद्धा लग्नानंतर जन्मभर एकमेकांसोबत तितक्याच आत्मीयतेने रहायचं. अनेक वेळा कसोटी पाहणारे कठीण क्षण ही आयुष्यात येतात या सर्वांवर मात करत हे नातं टिकवून ठेवणं. या नात्यातील रुसवा-फुगवा, अनामिक ओढ दाखवतानाच दोन युगांमधील माणसे कशी एकमेकांशी जोडली गेली असतील. त्याच्यातील संबंध, सामायिक धागा उलगडून दाखवणारा ‘Once मोअर’ हा उद्या १ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

 

once more 04

 

‘Once मोअर’ या चित्रपटातून कपिल आणि अंजली या जोडप्याची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या जोडप्याच्या आयुष्यात एका रहस्याचा उलगडा झाल्यानंतर या जोडप्याच्या आयुष्यात नेमका काय बदल होणार? या बदलाला ते कसे सामोरे जाणार? याची कथा ‘Once मोअर’ चित्रपटात दाखवली जाणार आहे. नरेश बिडकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यांनी या आधी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांन मधून काम केले आहे. दिग्दर्शक-अभिनेता नरेश बिडकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘Once मोअर’ हा पहिला चित्रपट आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची या चित्रपटात खूप वेगळी भूमिका आहे. आजवर नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्री ने या वेगळ्या भूमिकेचं शिवधनुष्य पेललं आहे. या चित्रपटात त्या आजोबाच्या पुरुषी रूपात त्या आपल्या समोर येणार आहेत. विष्णू मनोहर यांनी या चित्रपटाची निर्मिती केले असून ते या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनय क्षेत्रात पदार्पण करताहेत.

 

once more 03

 

या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, विष्णू मनोहर, नरेश बिडकर या अनुभवी कलाकारांसोबत आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी हे दोन नवे चेहरे आपल्या समोर येत आहेत. वंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्शन तसेच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. श्वेता बिडकर यांनी या या चित्रपटाचे लेखन केले आहे. १ ऑगस्टला ‘Once मोअर’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.