Upcoming Marathi movie “PETH”

Peth Marathi Movie 01

 

प्रेम हि भावना आपण सर्वानी आयुष्यात कधी ना कधी नक्कीच अनुभवली असेल. त्यामुळे या भावनेचं महत्त्व प्रत्येकाच्या मनात वेगळं असतं. नात्यातील प्रेमाची अनुभूती देणार ‘पेठ’ हा चित्रपट लवकरच येत आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर अनावरणा सोहळा पार पडला. ‘शारदा’ फिल्म प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘पेठ’ चित्रपटाचे निर्माते वीरकुमार शहा तर दिग्दर्शक अभिजित साठे आहेत.

 

Peth Marathi Movie 02

 

मनुष्याला प्रेम होणे ही एक सहजवृत्ती आहे परंतु प्रेम निभावणं मात्र आज जिकरीची गोष्ट आहे. आज आपण अनेक छोट्या कारणांवरून दूर होणारे जोडपे पाहतो. अशाच या विखुरलेल्या विश्वातील एक सावरलेल्या प्रेमाची गोष्ट आपण ‘पेठ’ या चित्रपटात पाहणार आहोत. हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा असल्यामुळे ही प्रेमकथा प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास दिग्दर्शक अभिजित साठे यांनी व्यक्त केला. याचित्रपटानिमित्त वृषभ शहा आणि नम्रता रणपिसे ही नवी जोडी आपण पाहणार आहोत. वृषभ शहा याला तसेच नम्रता रणपिसे हे नवोदित कलाकार असून या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांनी विशेष मेहेनत घेतली आहे. यासोबत अभिषेक शिंदे, राज खंदारे, संकेत कदम या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका असणार आहेत.

 

Peth Marathi Movie

 

अभिजित साठे यांनी या चित्रपटाचे लेखन पटकथा-संवाद तसेच कलादिग्दर्शन केले आहे. पी.शंकर यांनी गीत-संगीताची तर नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी गजानान शिंदे यांनी सांभाळली आहे.अविनाश जाधव हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.