Upcoming Marathi Movie “BEBHAN” NEW Poster is out

मराठी सिनेसृष्टीत अनेक चांगले विषय हाताळले जात आहेत, याचाच परिणाम म्हणजे हिंदी सिनेसृष्टीत आपले नशीब अजमावणारे कलाकारही आता प्रामुख्याने मराठी सिनेसृष्टीकडे वळताना दिसत आहेत. हिंदीत नावाजलेल्या अनेक कलाकारांची उदाहरणे देता येतील.

शरद केळकर, मुरली शर्मा यांनी मराठी सिनेमात पदार्पण केले. आता ठाकूर अनूपसिंग या हिंदी सिनेसृष्टीतल्या अभिनेत्यालाही मराठी सिनेमांचा मोह आवरता आला नाही.दिग्दर्शक अनुप अशोक जगदाळे यांच्या ‘बेभान’ या सिनेमातून ठाकूर अनुपसिंग मराठीत दमदार पदार्पण करणार आहे. २२ व्या वर्षापासून ठाकूर अनुपसिंगने आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती.

thakur anoopsingh
thakur anoopsingh

छोट्या पडद्यापासून करिअरला सुरुवात केल्यानंतर आता लवकरच बेभान या सिनेमातून ठाकूर अनुपसिंगचा राऊडी लुक आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.सोशल मीडियावर पोस्टरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या पोस्टरवर ठाकूर अनुपसिंगचा रांगडा तसेच प्रेमात बेभान झालेला प्रियकर आपल्याला दिसून येतोय.

लाल हा प्रेमाचा रंग असल्याने हे पोस्टरदेखील लाल रंगाच्या बॅकग्रॉउंडवर बनवण्यात आले आहे. मृण्मयी देशपांडे आणि ठाकूर अनुपसिंग या दोघांच्या प्रमुख भूमिका आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. मधुकर (अण्णा) उद्धव देशपांडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून प्रसाद देशपांडे हे सहनिर्माते आहेत. दिनेश देशपांडे लिखित आणि शांभवी फिल्म्स निर्मित हा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more about Bebhan

One thought on “Upcoming Marathi Movie “BEBHAN” NEW Poster is out

  • January 9, 2017 at 7:20 am
    Permalink

    Nice

Leave a Reply

Your email address will not be published.