‘Unmatta’ upcoming science fiction movie.

Unmatta 01

 

आपल्याकडे विशेषतः फॅमिली ड्रामा, लव्हस्टोरी किंवा अक्शन असलेले चित्रपट कायम पाह्यला मिळतात. परंतु एखादा ग्लोबल सिनेमा म्हंटलं की काहीतरी दर्जेदार पहायला असे आपल्या ला सहाजिक वाटते, आणि या गोष्टी चे प्रमुख कारण म्हणजे या चित्रपटातून हाताळे जाणारे विषय आणि कथा-पटकथा यावर केलं जाणारं प्रचंड काम. सध्या आपल्याइथे देखील असे चित्रपट बनवण्यास सुरवात झाली आहे असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही.

 

‘उन्मत्त’ हा असच एक वेगळा चित्रपट लावलाच आपल्यासमोर येत आहे. २४ एफ एस निर्मित हा चित्रपट येत्या २२ फेब्रुवारी २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.‘स्लीप पॅरालिसीस’ चा अनाकलनीय अनुभव स्वतः अनुभवल्यानेच दिग्दर्शक महेश राजमाने यानी त्यांच्या अनुभवावर आधारीत “उन्मत्त” या चित्रपटाची कथा लिहिली आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

 

स्वप्नांचे आभासी जग आणि प्रत्यक्ष जग, जगाची उत्पत्ती, देव अन दानव, प्रेम आणि प्रतिशोध या सर्व संकल्पनांचा उहापोह या चित्रपटातून आपल्याला दिसणार आहे . साय-फाय हॉलीवूडपटाच्या धर्तीवर बनलेला हा मराठी चित्रपट, तमाम मराठी-अमराठी प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करेल, असा विश्वास दिग्दर्शक महेश राजमाने याना आहे. तसेच या चित्रपटात वापरले गेलेले स्पेशल इफेक्ट्स आणि अंडरवॉटर सीन्स हे “उन्मत्त” या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहेत.

 

आरुषी, विकास बांगर, पूर्णिमा दे, प्रसाद शिक्रे, संदीप श्रीधर व संजय ठाकूर असे तरुण रक्ताचे कलाकार आपण या चित्रपट पाहणार आहोत .राजेंद्र खैरे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, शहाजी शिंदे सहनिर्माते आहेत. लेखन व दिग्दर्शन महेश राजमाने यांचे असून संवादासाठी सह्कार्य प्रशांत जोशी यानी केले आहे. या चित्रपटातील गीते शिवाजी जोशी, गावडा व महेश राजमाने यानी लिहिली असून रुपाली मोघे आणि जसराज जोशी यांनी गायली आहेत. ‘उन्मत्त’ हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, याचा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमला आहे.