‘Unmatta’ horror, sci-fi movie releasing Tomorrow

unmatta movie 02

 

उद्या प्रदर्शित होत असणाऱ्या उन्मत्त चित्रपटाबद्दल आपल्याल्या नक्कीच माहिती असेल. परंतु उन्मत ह्या त्यांच्या विज्ञानपटाचे काही सीन्स अंडरवॉटर शूट करण्यात आले आहेत हे तुम्हाला माहित आहे का ? आणि विशेष म्हणजे सुद्धा पाच सहा नाही तर तब्बल चाळीस फूट . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटातील काही सीन्स तब्बल चाळीस फूट खोलीवर शूट करण्यात आहे आहेत.

 

unmatta movie 03

 

उद्या अर्थात २२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या उन्मत्त या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश राजमाने हे आहेत . शूटिंग दर्म्याचा अनुभव सांगताना ते म्हणतात , जेव्हा चाळीस फूट पाण्यात शूटींग करायचे आहे असं या चित्रपटातील कलाकारांना आणि तंत्रज्ञांना समजले तेव्हा त्यांना हि चेष्टा वाटली. परंतु ती चेष्टा नाहीये हे कळताच सगळ्यांच्या तोंडचं पाणीच पळालं. विषयाचे गांभीर्य लक्षक्त येताच कलाकार आणि तंत्रज्ञ ह्यांनी मोठ्या कष्टानं आणि जिद्दीनं हे अंडरवॉटर सीन्स पूर्ण केले. या चित्रपटातील अंडरवॉटर सीन्सचं चित्रीकरण इंद्रनील नुकटे यांनी केलं आहे. आणि यावेळी या सगळ्यांना चाळीस फूट पाण्याखाली खूप कष्ट घ्यावे लागले असणार ह्यात शंका नाही.

 

unmatta movie 04

 

आता नक्की हे चाळीस फूट पाण्याखाली काय शूट केलाय ते पाहण्यासाठी आपल्याला चित्रपट पहावा लागेल. ‘स्लीप पॅरेलिसीस’ या विषयावर आधारित हा साय फाय चित्रपट आपल्या काही मुळ संकल्पनांनाच धक्का देऊन जातो. काहीतरी वेगळं पहाण्याऐवजी तुम्हाला जर ‘वेगळं अनुभवावं’ घायचा असेल तर ‘उन्मत्त’ हा चित्रपट नक्की पहा. उद्यापासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात .