Umesh Kamat and Tejashree Pradhan team up for ‘Asehi Ekada Vhave’

Asehi Ekada Vhave 01

 

माणसाच्या आयुष्यात अनेक नाती असतात आणि या नात्यांच्या गुंतागुंतीतून त्याचे आयुष्य घडत जाते. नात्यातील चाड- उत्तर वाद – विवाद सोडवताना ‘असे हि एकदा व्हावे’ असे प्रत्येकाला नक्कीच वाटते. नात्याच्या याच आशावादी पैलूंवर आधारित झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘असे हि एकदा व्हावे’ हा चित्रपट लवकरच तुमच्या समोर येत आहे. उमेश कामत आणि तेजश्री प्रधान या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला.

 

या वेळी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती . या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, दाखवण्यात आलेली उमेश आणि तेजश्रीची लव्हकेमिस्ट्री आपणास नक्की आवडेल. या चित्रपटामध्ये तेजश्रीचा मॉडर्न लुक असून ती आर.जे. च्या भूमिकेत तुमच्यासमोर येणार आहे . दोघांना वाटणारी प्रेमाची अनाहूत जाणीव आणि नाते स्वीकारण्यापूर्वीचे दडपण या ट्रेलरमध्ये दिसून येते. शिवाय या दोघांबरोबरच शर्वाणी पिल्लई, डॉ. निखील राजेशिर्के, चिराग पाटील आणि कविता लाड व अजित भुरे या कलाकारांची देखील झलक आपल्याला यात पाहायला मिळते. या चित्रपटातील ‘किती बोलतो आपण’ आणि ‘सावरे रंग मै’ ही दोन गाणीदेखील प्रेक्षकांना आवडत आहेत. मराठीचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतदिग्दर्शक अवधूत गुप्ते यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या गाण्यांमधील ‘किती बोलतो आपण’ हे गाणे वैभव जोशी यांनी लिहिले असून त्याला कीर्ती किल्लेदारचा आवाज लाभला आहे. तर समीर सामंत लिखित ‘सावरे रंग मै’ हे गाणे सावनी शेंडे हिने गायले आहे. शिवाय ‘भेटते ती अशी’ या गाण्याने तसेच, ‘यु नो व्हॉट’ या कवितेने रसिकांच्या मनावर यापूर्वीच मोहिनी घातली आहे.

 

या चित्रपटाच्या दर्जेदार ट्रेलर लाँच बरोबरच सुमधुर गाण्यांची मैफिलदेखील झाली ज्याच्या प्रेक्षकांनी मनसोक्त आनंद लुटला. मधुकर रहाणे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून रविंद्र शिंगणें यांचे सहकार्य यात लाभले आहे. प्रेमाची नवी परिभाषा मांडणारा ‘असे हि एकदा व्हावे’ येत्या ६ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. पहा या चित्रपटाचा ट्रेलर :