Tusshar Kapoor launched the trailer of Marathi film Vakya

Tushar Kapoor Vakya 01

 

काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेते -अभिनेत्री मराठी सिनेमाचे प्रमोशन करताना दिसतात. इतकाच नव्हे तर अनेक बॉलिवूड स्टार स्वतः सोशल मीडियावरून मराठी चित्रपटाचे ट्रेलर शेअर करत प्रमोशन करतात. बॉलीवूड मधील अभिनेता तुषार कपूर याने हि मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये पुढाकार घेतला आहे. वाक्या या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च तुषार कपूर ने केला आहे. ट्रेलर लॉन्च सोहळ्याच्या वेळी त्याने रसिकांना सिनेमा पाहण्याचे आवाहन केले आहे.

 

वाक्य हा चित्रपट वास्तववादी चित्रपट असून भटक्या-विमुक्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्या वेदना, त्यांचे प्रश्न समाजाने आधी समजून घेतले पाहिजेत या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. भटक्या समाजातील वंचिताना आपण आजही मुख्य प्रवाहात आणू शकलो नाही हे वास्तव लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक दिपक कदम यांनी वाक्या या चित्रपटातून केला आहे. माऊली निर्मित व आर.पी प्रोडक्शन प्रस्तुत वाक्या येत्या १३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपट पोतराजाच्या जीवनावर आधारित कथा दाखवण्यात आली आहे. विकासापासून दूर राहिलेलय या समाजासाठी आजही फार बदल झालेला नाही. वंशपरांपरगत चालत आलेल्या रूढीपरंपरा आणि अंधश्रध्दा यांच्या दलदलीतून बाहेर पडणे त्यांना आजही शक्य झालेले नाही. या सर्व परिस्थितीला सामोरे जात यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोतराजाच्या संघर्षा या चित्रपटातून दाखवला जाणार आहे . वाक्या या चित्रपटाने अनेक महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे.

 

चित्रपटातील पोतराजची भूमिका ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी साकारली आहे. तसेच या चित्रपटातील घुम्या हे पात्र अभिनेता अभिजित कुलकर्णी याने साकारले आहे. त्याचबरोबर किशोरी शहाणे, प्रेमा किरण, गणेश यादव, प्रियांका ज्ञानलक्ष्मी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा दिपक यांची असून संवाद अभिजीत कुलकर्णी व प्रियांका ज्ञानलक्ष्मी यांचे आहेत. चित्रपटाची गीते बिपिन धायगुडे यांनी लिहिली असून संगीत देव आशिष यांचे आहे. राजेंद्र पडोळे व दिपक कदम चित्रपटाचे निर्माते असून कार्यकारी निर्माते विनोद कुमार बरई आहेत. १३ ऑक्टोबरला वाक्या सर्वत्र प्रदर्शित होईल.