Trailer of ‘Tula Kalnnaar Nahi’ launched by Sachin and Supriya Pilgaonkar

Tula Kalnaar nahi trailer launch 03

 

नुकतंच तुला कळणार नाही’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या वेळी राहुल मानकामे (सुबोध भावे) आणि अंजली मानकामे (सोनाली कुलकर्णी) या जोडींना गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी केली . विशेष मन्हजे यासाठी त्यांना मराठी सिनेजगतातील रियल जोडी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी मदत देखील केली. हा सोहळा दादर येथील प्लाझा सिनेमागृहात पार पडला. या सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात, गणेशआगमनाच्या पूर्वतयारीचा मोठा देखावा उभारण्यात आला होता.या वेळी पारंपरिक पेहराव परिधान करत या सिनेमाच्या सर्व स्टारकास्टनी उपस्थिती लावली होती.

 

Tula Kalnaar nahi trailer launch 01

सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तुत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेल्या सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरचे सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या मराठीतील आदर्श दाम्पत्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या ट्रेलर मध्ये दाखवण्यात आलेलं नवरा-बायकोच्या नात्यातील रुसवा-फुगवा, अनामिक ओढ आणि एकमेकांवरचे अबोल प्रेम प्रत्येक नवराबायकोला आपलासा करणारा आहे. वैवाहिक नात्यात बांधलो गेले असल्यामुळे, आयुष्यात येणारे अनेक प्रसंग या चित्रपोटातून मांडण्यात आले आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरमधील सुबोध- सोनालीची केमिस्ट्री सर्वानाच आवडली असून, त्यांची ही लग्नानंतरची लव्हस्टोरी प्रेक्षकांना भरपूर आवडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

Tula Kalnaar nahi trailer launch 02

 

या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी करत असून सुपर स्टार स्वप्नील जोशी निर्मात्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. श्रेया योगेश कदम, अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार यांची निर्मिती आणि निरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार यांची सहनिर्मिती असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजनाची खुमासदार मेजवानी देण्यास येत आहे.

 

‘तुला कळणार नाही’ हा चित्रपट येत्या ८ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. आवर्जून पाहा या चित्रपटाचा ट्रेलर.