Tejashri Pradhan and Mangesh Desai will be seen together in ‘Judgement’

लवकरच आपल्या भेटीसाठी ‘जजमेंट’ हा मराठी चित्रपट येत आहे . ‘गुढीपाडवा’ या शुभ दिवसाचे औचित्य साधून ज्योत्स्ना फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित ‘जजमेंट’ या मराठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने गुढीपाडवा साजरा करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली.

 

Judgement 01

 

‘जजमेंट’ हा थरार पट असून येत्या २४ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मंगेश देसाई, तेजश्री प्रधान आणि माधव अभ्यंकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत .‘जजमेंट’ हा चित्रपट एक वेगळा विषय आणि वेगळा अनुभव देणारा असणार आहे असे या चित्रपटाच्या टीम चे मत आहे.अद्याप या चित्रपटाची मुख्य कथा काय याचा खुलासा करण्यात आलेला नाही . परंतु नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरून हा चित्रपट नक्कीच एक रोमांचकारी अनुभव देणारा असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

अभिनेता मंगेश देसाई आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रथमच या चित्रपटातुन एकत्र झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय वेगळी असणार आहे . या दोघांना चित्रपटात बघतांना प्रेक्षक नक्कीच आश्चर्यचकित होणार असे चित्रपटाच्या टीम चे मत आहे. या चित्रपटात ‘श्री पार्टनर’ फेम श्वेता पगार हिचीसुद्धा महत्वाची भूमिका आहे. या शिवाय सतीश सलागरे, किशोरी अंबिये ,महेंद्र तेरेदेसाई, शलाका आपटे, विजय भानू, शिल्पा गांधी, प्रतीक देशमुख, निलेश देशपांडे, बाल कलाकार चैत्रा भुजबळ आणि नुमायारा खान हे कलाकार या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.

 

Judgement 03

 

निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या “ऋण” कादंबरीवर हा चित्रपट आधारित असून समीर रमेश सुर्वे हा चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत . डॉ. प्रल्हाद खंदारे आणि हर्षमोहन कृष्णात्रेय यांनी या चित्रपटाचे निर्माते आहेत.